उल्हासनगर : राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. अशावेळी राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया उल्हासनगर पालिकेचं इत्यंभूत वॉर्डनिहाय आरक्षण…
पालिकेचं नाव : उल्हासनगर महापालिका
- प्रभागांची संख्या – 30
- सदस्य संख्या – 89
अनुसूचित जमाती
- एकूण जागांची संख्या – ०1 (महिला)
अनुसूचित जाती
- एकूण जागा- 15 (8 महिला)
सर्वसाधारण (ओपन कॅटेगिरी)
- सर्वसाधारण महिला – 36
- सर्वसाधारण खुल्या जागा – 37
अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग-
- 3 अ, 10 अ, 11 अ, 15 अ, 19 अ, 20 अ, 27 अ
अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव प्रभाग –
- 4 अ, 5 अ, 13 अ, 14 अ, 18 अ, 21 अ, 25 अ, 30 अ
अनुसूचित जमाती राखीव प्रभाग –
- 1 अ
सर्वसाधारण महिलांसाठी राखीव एकूण जागा
- प्रभाग क्रमांक – 1 ब, 2 अ, 3 ब, 4 ब, 5 ब, 6 अ, 7 अ, 8 अ ब, 9 अ, 10 ब, 11 ब, 12 अ ब, 13 ब, 14 ब, 15 ब, 16 अ, 17 अ, 18 ब, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 अ ब, 23 अ, 24 अ, 25 ब, 26 अ ब, 27 ब, 28 ब, 29 अ ब, 30 ब
- वरील आरक्षण सोडून उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या आहेत.
सध्याची पक्षीय बळ संख्या
- भाजप – 32
- शिवसेना – 25
- काँग्रेस – 1
- राष्ट्रवादी – 4
- मनसे – 0
- इतर – 16