अहमदनगर: केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) आज महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. अमित शाहांच्या उपस्थितीत सहकार परिषद व शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड , चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रथमच अमित शाह यांचा हा दौरा आहे. अमित शाह साई दर्शनासाठी साई दरबारी हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह दोन दिवस शिर्डी आणि पुणे दौऱ्यावर असतील, अशी माहिती आहे. अमित शाह आज शिर्डीत येणार असून साईबाबांचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. यानंतर अमित शाह सहकार परिषदेला उपस्थित राहतील. सहकराची सुरूवात झालेल्या प्रवरा येथे देशाची पहिली सहकार परिषदेत होणार असून विचारमंथनही होणार आहे.
भाजप आमदार-नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे-पाटील सहकार यांनी परिषदेचे आयोजन केले आहे. सहकार क्षेत्रातील तज्ञ मंडळी परिषदेत सहभागी होणार असून आणि सहकाराच्या स्थितीवर चर्चा करणार आहेत. अमित शाह सहकार संदर्भात काही परिषदेत काही महत्त्वाच्या घोषणा करणार का, याकडे लक्ष लागलं आहे. राज्यात सहकारी कारखाना आणि भ्रष्टाचाराबाबत राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोप सुरू चर्चा असताना शाह यांचा दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आली. अमित शाह यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात येणार आहेत.
इतर बातम्या:
Union Cooperative Minister Amit Shah will came to Cooperation Council at Pravarangar Ahmednagar