कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प नारायण राणेंनी आणला, आमदार वैभव नाईक यांचा आरोप

| Updated on: Aug 01, 2021 | 12:08 AM

कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प नारायण राणेंनी उद्योग मंत्री असताना आणल्याचा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प नारायण राणेंनी आणला, आमदार वैभव नाईक यांचा आरोप
वैभव नाईक
Follow us on

सिंधुदुर्ग: कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प नारायण राणेंनी उद्योग मंत्री असताना आणल्याचा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध झुगारून प्रकल्प लादण्याचं काम राणेंनी केलं असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. आता जी पुरपरीस्थिती जिल्ह्यात उद्भवतेय, डोंगर खचतायत याला कळणे मायनिंग पासून सुरुवात झाली आहे, असंही वैभव नाईक म्हणाले.

कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प स्थानिकांच्या माथी मारण्याचं काम 13 वर्षापूर्वी राज्याचे उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी केलं. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध झुगारून प्रकल्प लादण्याचं काम राणेंनी केलं असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने आमदार वैभव नाईक यांनी केला आहे त्यावेळी 302 सारख्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकवून स्थानिकांना तुरुंगात टाकण्याचे काम राणेंनी केले होते, असाही आरोप नाईक यांनी केला

किती स्थानिकांना रोजगार मिळाला

कळणे मायनिंग प्रकल्पामधून हजारो लोकांना रोजगार देण्याचे आमिष त्यावेळी दाखविण्यात आले. मात्र, गेल्या 13 वर्षात कळणे मायनिंग प्रकल्पामुळे किती लोकांना रोजगार मिळाला हे राणेंनी एकदा जाहीर करावे.
असं आवाहनही वैभव नाईक यांनी केलं आहे.

नारायण राणेंनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करावी

आता जी पुरपरीस्थिती जिल्ह्यात उद्भवतेय, डोंगर खचतायत याला कळणे मायनिंग पासून सुरुवात झाली आहे असा आरोपही वैभव नाईक यांनी केला आहे. त्यामुळे आता नारायण राणेंनी केंद्रीय उद्योगमंत्री झाल्यानंतर कळणेवासियांच्या जीवावर बेतलेल्या या कळणे मायनिंग प्रकल्पाबाबत व येथील पर्यावरण सदर्भात केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

इतर बातम्या:

चिथावणीखोर वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची पलटी, माध्यमांनी विपर्यास केल्याचा केल्याचा कांगावा, नेमकं काय घडलं?

सेवानिवृत्त पोलिसाला मंत्र्यांचा सॅल्युट, यशोमती ठाकुरांच्या सॅल्युट मागील इनसाईड स्टोरी नेमकी काय?

मोठी बातमी ! ओबीसी आरक्षणासाठी राज्याचं मोठं पाऊल, केंद्राने इंपिरिकल डेटा द्यावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Vaibhav Naik slam Narayan Rane slammed over Kalane Mining project in Kokan