VIDEO : उन्हाळा, उष्णता अन् भारनियमन; संतप्त नगरसेवकाकडून वीज वितरण कार्यालयाची तोडफोड

| Updated on: Apr 08, 2022 | 5:24 PM

वातावरणातील उकाडा वाढला आहे. अहमदनगर शहराचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. उकाड्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच हैराण होत आहेत. त्यातच वारंवार होत असलेल्या भारनियमनामुळे लोकांच्या त्रासात भर पडली आहे.

VIDEO : उन्हाळा, उष्णता अन् भारनियमन; संतप्त नगरसेवकाकडून वीज वितरण कार्यालयाची तोडफोड
संतप्त नगरसेवकाकडून वीज वितरण कार्यालयाची तोडफोड
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर : वारंवार लाईट जात असल्याने संतापलेल्या नगरसेवकाने वीज वितरण कार्यालयाची तोडफोड (Vandalism)केल्याची घटना अहमदनगरमधील केडगाव येथे घडली आहे. मनोज कोतकर (Manoj Kotkar) असे तोडफोड करणाऱ्या नगरसेवकाचे नाव आहे. लाईट कशामुळे गेली याबाबत विचारणा करण्यासाठी नागरिक वीज वितरण कार्यालयात फोन करत होते. मात्र कार्यालयातील फोन बंद येत होता. आधीच उन्हाळा सुरु असल्यामुळे गरमीने लोक हैराण झाले आहेत. त्यात वारंवार लाईट जात असल्याने नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडली आहे. यामुळे संतप्त झालेले नगरसेवक मनोज कोतकर यांनी थेट केडगाव येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन तोडफोड करुन आपला राग व्यक्त केला. (Vandalism of power distribution office by angry corporator due to frequent lights going out)

सततच्या भारनियमनामुळे नागरिक हैराण

वातावरणातील उकाडा वाढला आहे. अहमदनगर शहराचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. उकाड्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच हैराण होत आहेत. त्यातच वारंवार होत असलेल्या भारनियमनामुळे लोकांच्या त्रासात भर पडली आहे. रात्री-अपरात्री अचानक वीज गुल होत असल्याने नागरिकांना रात्रीची झोप मिळणेही कठिण झाले आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याबाबत विचारणा करण्यासाठी नागरिक कार्यालयात फोन करत होते. मात्र कार्यालयातील फोनही बंद येत होता. अखेर नागरिकांनी याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीला माहिती दिली. त्यानंतर मनोज कोतकर यांनीही वीज वितरण कार्यालयाशी आणि अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होत नसल्याने संतापलेल्या कोतकर यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन तोडफोड केली. (Vandalism of power distribution office by angry corporator due to frequent lights going out)

इतर बातम्या

Sangli Crime : सांगलीत पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

Madhya Pradesh: पत्रकारासह आठ जणांची पोलीस ठाण्यात अर्ध नग्न परेड, मध्यप्रदेश पोलिसांवर छळवणुकीचा आरोप; काय आहे प्रकरण?