मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हा थरार तुमच्या अंगावर काटा आणेल, अपघातात चूक कुणाची ?

| Updated on: Apr 05, 2023 | 11:43 AM

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघाताचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. मुंबई-गुजरातला चाललेला ट्रेलर अनियंत्रित झाला. यानंतर महामार्गावर अपघाताचा थरार पहायला मिळाला.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हा थरार तुमच्या अंगावर काटा आणेल, अपघातात चूक कुणाची ?
भरधाव ट्रेलरची कारला अपघात
Image Credit source: TV9
Follow us on

वसई / विजय गायकवाड : वसईत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रेलरने कारने धडक दिल्याने कार चालक गंभीर जखमी झाला आहे. वसई हद्दीत ससूनवघर येथील ब्रिजजवळ काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक नागरिक आणि वालीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. सध्या कार चालकांची ओळख पटली नसून, वालीव पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

नियंत्रण सुटल्याने ट्रेलर दुसऱ्या लेनमध्ये घुसला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रेलर मुंबईवरून गुजरातला चालला होता. वसईतील ससूनवघर ब्रिजजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलर मुंबईच्या लेनमध्ये घुसला आणि थेट महिद्रा एस्कयुव्हीला धडकला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. कारचा चालक गंभीर झाला आहे.

जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

स्थानिक नागरिक आणि वालीव पोलिसांनी तात्काळ मतदकार्य हाती घेत जखमी चालकाला बाहेर काढले. जखमीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ससूनवघर ब्रिजवर गेल्या 15 दिवसापासून लाईट बंद आहे. त्यामुळे ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटले असावे आणि हा अपघात झाला असावा, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात डिझेल टँकर पलटला

मुक्ताईनगरकडून अकोल्याकडे जाणारा 12 हजार लिटर क्षमतेचा डिझेल टॅंकर मलकापूर धरणगाव नजीक पलटी झाल्याची घटना काल रात्री घडली. एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. अपघातग्रस्त टॅंकर जामनगर रिलायन्स डेपोमधून डिझेल भरून नागपूर येथे जात होता.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धावत आले. यानंतर टँकरमधील डिझेल भरण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. यामध्ये डिझेलचे नुकसान झाले, असून कुठलीही जीवित हानी नाही.