वाशिम : मुसळधार पावसाने माणसासह प्राण्यांनाही बेघर केलंय. अनेक ठिकाणी तर पाळीव प्राणी पाण्यात अडकून मृत्यूमुखी पडले. मात्र, अशाही परिस्थितीत प्राण्यांची माणसांसोबतचा बंध वारंवार अनुभवायला मिळतो. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातही अशीच एक घटना घडलीय. मानोका येथील या घटनेतून या कुत्र्याचं मालकाप्रति प्रेम पाहायला मिळालं. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे.
वाशिममधील मानोरा तालुक्यात एक कुत्रा आपल्या मालकाला भेटायला दुथडी भरुन वाहत असलेल्या पुलावरुन दुसऱ्या काठावर पोहत गेला. रुई ते गोस्ता मार्गावरील पुलावर हा प्रकार घडला. पुलावर पाणी असल्याने तिथून जाणं अवघड होतं. मात्र, अशाही परिस्थितीत कुत्रा चक्क पोहत दुसऱ्या काठावर पोहचला. हे घडत असताना तिथं उपस्थित असलेल्या अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं. त्यानंतर हा व्हिडीओ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Video of Dog swim in flood water to meet owner in Washim