रत्नागिरी: कर्जाचे हप्ते भरले नाहीत म्हणून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि चिरंजीव नितेश राणे यांना लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर खोचक टीका केली आहे. केंद्राच्या गृहखात्याच्या सूचनेवरूनच राज्याच्या गृहखात्याने ही कारवाई केली आहे. हवं तर नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी, असा खोचक टोलाही विनायक राऊत यांनी लगावला. (vinayak raut taunt nitesh rane over lookout circular)
विनायक राऊत यांनी मीडियाशी बोलताना लूकआऊट नोटिसच्या मुद्द्यावरून नितेश राणेंवर टीकास्त्र सोडलं. डिएचएफल फायनान्स कंपनीच्या संचालकांनी या प्रकरणी केंद्राच्या गृहखात्याकडे लेखी तक्रार केली आहे. आमची रक्कम देणं असल्याने या दोघांना देशाबाहेर जावू देवू नका असं या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या सूचना केंद्र सरकारच्या गृहखात्याने राज्य सरकारच्या गृहखात्याला दिल्या आहेत. याबाबतची अधिक माहिती नितेश राणेंनी दिल्लीत जावून मिळवावी, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला.
नारायण राणे भाजपमध्ये येण्यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही वर्षापूर्वी नितेश राणे यांनी विविध रिसॉर्टसाठी घेतलेल्या कर्जाचा आरोप केला होतो. त्यामुळे याबाबत किरीट सोमय्यांकडून अधिक माहिती मिळू शकेल, असा चिमटा राऊत यांनी काढला. लूकआऊट नोटीसही कायद्यानुसार आहे. जी कारवाई होतेय ती केंद्र सरकारच्या निर्देशाने होतेय, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणीही प्रतिक्रिया दिली. जरंडेश्वर साखर कारख्यान्यासंदर्भात अनियमितता झाली असेल तर बिनधास्त चौकशी करा, असं ते म्हणाले. किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या मंत्र्याविरोधात आकस धरून काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
नितेश राणे आणि त्यांच्या आईच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून 40 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. राणे कुटुंबियांनी आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी कर्ज घेतलं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत
दरम्यान, नितेश राणेंनी या प्रकरणी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. पाच महिने अगोदर आम्ही संबंधित बँकेला पत्र दिलं होतं की आम्हाला हे कर्ज सेटलमेंट करायचं आहे. बँकेकडे ते पत्र आहे. मग आता अशा पद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थ नाही. दुसरा मुद्दा हा की आमचं हे लोन अकाऊंट मुंबईच्या बँकेत आहे. मग, पुणे पोलिसांनी हे सर्क्युलर का काढलं? जर एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला लोन सेटलमेंट करायचं असेल तर अशापद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थच नाही. हा पूर्ण राजकारणाचा भाग आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. हे लूकआऊट सर्क्युलर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला देण्यात आलं आहे. सगळ्या एअरपोर्ट्सना. आम्ही या सर्क्युलरविरोधात हायकोर्टात दाद मागणार आहोत. याला काही अर्थ नाही. कारण जे लोन आम्हाला 5 महिन्यांपूर्वी भरायचं होतं त्याची आता नोटीस काढून काही अर्थ नाही ना. ठाकरे सरकार आम्हाला घाबरलं आहे, अशा पद्धतीने पत्र आणि नोटीस काढत बसले आहेत, असंही ते म्हणाले होते. (vinayak raut taunt nitesh rane over lookout circular)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 10 September 2021https://t.co/Ha7WGja4QD
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 10, 2021
संबंधित बातम्या:
राणे कुटुंबाबाबत लूकआऊट सर्क्युलर, आता नितेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर, ठाकरे सरकारला इशारा
केंद्रातील जुलमी, अत्याचारी भाजपा सरकारविरोधात पेटून उठा, नाना पटोलेंचं साताऱ्यातून जनतेला आवाहन
(vinayak raut taunt nitesh rane over lookout circular)