मुंबई : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरालागत असलेल्या 3 उपदेवतांची मंदिरे कोरोना नियमांचे उल्लंघन करीत गर्दी केल्याने तहसिलदार सौदागर तांदळे यांनी सील केले आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या मंदिराची स्वतः पाहणी केल्यानंतर गर्दी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. (Violation of Corona rules, sealing temples of 3 temle of Tulja Bhavani )
कोरोना संसर्गाचा अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने अनेक भाविक तुळजाभवानी देवीच्या महाद्वाराचे व मंदिर कळसाचे दर्शन बाहेरून घेतात मात्र तुळजाभवानी मंदिर परिसर शेजारील उपदेवी देवतांची मंदिरे मात्र खुली असल्याने या भागात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती.
तुळजाभवानी मंदिर लगत असलेल्या अन्नपूर्णा देवी , टोळ भैरव व मातंगी देवी मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने वारंवार तोंडी सूचना देऊनही इथे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे व उपाययोजनाची पायमल्ली होत असल्याने तहसिलदार तांदळे यांनी ही 3 ही मंदिरे तात्काळ सील केली आहे.
तुळजाभवानीच्या उपदेवतांची मंदिरे सील केली असली तरी देवीदेवतांच्या दैनंदिन धार्मिक विधी करण्यासाठी प्रशासनाने एक रजिस्टर ठेवणार आहे ज्यात कुलधर्म, कुलाचार करण्यासाठी मंदिरात येताना जाताना पूजारी यांची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही धार्मिक भावना दुखावली जाणार नाही , पुजाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.
हिंदू धर्मीय बरोबरच इतर धर्माचे प्रार्थना व धार्मिक स्थळे सुद्धा कोरोना नियमांमुळे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. भाविकांनी कोरोनाचं गांभीर्य पाळून शासनाला सहकार्य करावं, अशी अपेक्षा शासन प्रशासन व्यक्त करत आहे.
(Violation of Corona rules, sealing temples of 3 temle of Tulja Bhavani)
हे ही वाचा :
तुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन मंकावती तिर्थकुंडच हडप केलं, स्थानिक भाजप नेत्याचा प्रताप