वर्धा : अवघ्या तीन वर्षे चार महिन्यांच्या चिमुकलीच्या पावलांनी वेगवान धावत रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. आर्या टाकोने असे या चिमुकलीचे नाव आहे. आर्याने एक हजार मीटरचं अंतर अवघ्या सहा मिनिट एका सेकंदात पूर्ण केले आहे. त्यामुळे तिची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. (Wardha Arya Takone girls sets new record 1 km run distance cover in 6.1 minutes)
वर्ध्याच्या पुलगाव येथे राहणारी आर्या पंकज टाकोने. आर्याने वर्ध्यातील गांधीजींच्या पुतळ्यापासून सेंट अॅन्थोनी इंटरनॅशनल स्कूलपर्यंत एक हजार मीटरचं अंतर अवघ्या सहा मिनिटं एक सेकंदात पार केले आहे. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास हा रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे.
ठरलेल्या वेळापेक्षा कमी वेळात अंतर पूर्ण
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी एक हजार मीटर अंतर धावण्यास आठ मिनिटं तर एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी सात मिनिटांचा वेळ दिला होता. मात्र आर्यानं हे अंतर त्यापेक्षाही कमी वेळात पूर्ण करून रेकार्डवर नाव नोंदवलं आहे. या रेकॉर्डची घोषणा डॉ. मनोज तत्ववादी यांनी केली आहे.
आर्याची ऑलिम्पिकसाठीची तयारी करणार
आर्याचे वडील हे पोलिस कर्मचारी असून ते स्वत: खेळाडू आहेत. गेल्या दीड वर्षांपासून आर्याची यासाठी तयारी सुरू आहे. तसेच पुढे भविष्यात तिची ऑलिम्पिकसाठीची तयारी करणार आहे. तसेच ती भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळवणारी खेळाडू व्हावी, अशी इच्छा आर्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
आर्याच्या वेगानं पडलेल्या पावलांनी दोन रेकॉर्डवर नाव कोरलं आहे. त्यामुळे पुढे भविष्यात आणखी वेगानं पावलं पडत ती नवीन रेकॉर्ड स्थापित करेल, असा विश्वास अनेकांना आहे. (Wardha Arya Takone girls sets new record 1 km run distance cover in 6.1 minutes)
संबंधित बातम्या :
सिंहगड, खडकवासला धरणावर जाताय? गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर दंडासह गुन्हाही दाखल
नागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री