Video : काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर सोबत रेसिंग? गाडीत गाणी वाजवत जल्लोष,वर्धा अपघातापूर्वीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jan 31, 2022 | 9:00 AM

व्हिडीओत दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर सोबत त्यांनी रेसिंग लावल्याची चर्चा सुरु आहे. तर, एक विद्यार्थी आराम से म्हणत असल्यानं गाडीचा वेग किती असेल, याबद्दल देखील वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

Video : काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर सोबत रेसिंग? गाडीत गाणी वाजवत जल्लोष,वर्धा अपघातापूर्वीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
वर्धा जिल्ह्यात झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा आणखी व्हिडीओ समोर आला आहे
Follow us on

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या (Wardha Medical Collage Student Accident) सेलसुरा येथे 25 जानेवारीला झालेल्या अपघातात  वैद्यकीय महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. मृत विद्यार्थी हे नेमके गेले कुठे होते, याबाबत नानाविविध तर्कवितर्क लावले जात होते. मृत सात विद्यार्थ्यापैकी एक असलेल्या पवन शक्ती या विद्यार्थ्याचा सोमवारी दिवशी वाढदिवस (Birthday) होता आणि वाढदिवस साजरा करण्याकरिता सर्व विद्यार्थी बाहेर गेले होते. नागपूर-तुळजापूर महामार्गवरील देवळी समोरील इसापूर जवळील एका हॉटेलमध्ये हे गेले असून तेथील सीसीटीव्ही टीव्ही 9च्या हाती लागले होते. त्या अपघातापूर्वीचा आणखी एक व्हिडीओ टीव्ही 9 मराठीच्या हाती आला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या शुभम जयस्वाल (Shubham Jaiswal) याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट हा व्हिडीओ मिळाला आहे. या व्हिडीओतून आपल्याला असं दिसून येतं की गाडीमध्ये गाणी लावून विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहेत. व्हिडीओत दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर सोबत त्यांनी रेसिंग लावल्याची चर्चा सुरु आहे. तर, एक विद्यार्थी आराम से म्हणत असल्यानं गाडीचा वेग किती असेल, याबद्दल देखील वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

पाहा व्हिडीओ

इसापूरच्या हॉटेलमधून परत येत असतानाचा व्हिडीओ

सेलसुरा अपघात प्रकरणातील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. अपघाताच्या काहीवेळ पूर्वीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. देवळी तालुक्यात असलेल्या इसापूर हॉटेल मधून जेवण केल्यावर परत येताना गाडी चालवितानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अपघात झाल्याच्या सातव्या दिवशी व्हिडीओ व्हायरल होत आहे. शुभम जैस्वालच्या इन्स्टाग्राम आयडीवर हा व्हिडीओ होता.

काळ्या फॉर्च्युनर सोबत रेसिंगची चर्चा

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ शूट करताना ड्रायवरच्या बाजूच्या सीटवर बसून शूट केल्याचं बोललं जातं आहे. व्हिडीओत गाडीचा वेग अतिशय असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. व्हिडीओत काही विद्यार्थी हे पुढं जाणाऱ्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनरसंबंधी वक्तव्य करत असल्यानं काळ्या फॉर्च्युनर रेसिंग लावल्याची चर्चा सुरु आहे. गाडीत आराम से असा व्हिडीओत शब्द प्रयोग असल्यानं देखील गाडीचा वेग जादा असल्याची चर्चा आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं

तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले,नीरज चौहान, नितेश सिंग, विवेक नंदन,प्रत्युश सिंग, शुभम जयस्वाल आणि पवन शक्ती हे नितेश सिंग यांच्या वाहनाने पवन शक्तीचा वाढदिवस साजरा करायला निघाले होते.

इतर बातम्या:

वर्धा कार दुर्घटनेचे नेमके कारण काय?; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले चौकशीचे आदेश

‘आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं’; आमदार विजय रहांगडाले यांची मुलगा अविष्कारसाठी भावनिक पोस्ट

Wardha car accident another video viral on social media of car racing of with black Fortuner