अहमनगर : राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी गाजत आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे तर दुसरीकडे शिवसेना आणि ठाकरे गट वेगवेगळ्या मु्द्यांवर आक्रमक होत एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. त्यावरून आता राज्यातील राजाकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आमदार नितेश राणे सध्या अहमदनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी अहमदनगरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर हल्ल्याप्रकरणी त्यांनी आक्रमक होत हिंदू-मुस्लिम या विषयावरून प्रशासनाला थेट इशाराच दिला आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आता आणखी ढवळून निघणार असल्याचे दिसून येत आहे.
अहमदनगरला काही दिवसांपूर्वी शहरातील कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर हल्ल्या झाला होता. त्याप्रकारणी आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भेट घेतली आहे.
यावेळी नितेश राणे यांनी आक्रमक होत हल्ला करणाऱ्या आरोपींना थेट इशाराच दिला आहे. तसेच ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांवर हल्ला झाला त्या ठिकाणची पाहणी करून व्यापाऱ्यांबरोबर चर्चाही करण्यात आली आहे.
यावेळी भाषणामध्ये बोलताना मात्र नितेश राणे यांची जीभ घसरली आहे. त्यांनी थेट महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना शिवी दिली असून आयुक्तांना थेट शिवीगाळ केल्यामुळे आता प्रशासकीय पातळीवरून त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आमदार नितेश राणे यांनी अहमनगरमधील व्यापाऱ्यांवर हल्ला झाल्यानंतर तेथील व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांनी पोलीस प्रशासनबाबतही काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासन काम करत नसल्याचा आरोपगी त्यांनी त्यांच्यावर केली आहे. तसेच जर हिंदूंवर हात उचलले तर जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणात दिला आहेत.