वाशिम : पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्तव्यावर असलेले एपीआय महादेव भारसाकळे यांनी दारुच्या नशेत भर चौकात धिंगाणा घातला आहे. त्यांनी वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथे दारूच्या नशेत राडा करत भाजीविक्रेत्या महिलांनाही शिवीगाळ केली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. एपीआय भारसाकळे यांनी केलेले हा गोंधळ पाहण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. (Washim API Mahadev Bharasakle got drunk and used abusive word against women)
मिळालेल्या माहितीनुसार वाशिम पोलीस अधिक्षक कार्यालयात महादेव भारसाकळे हे एपीआय म्हणून रुजू झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त दारुचे सेवन करत वाशिम शहरातील गुरुवार बाजार परिसरात धिंगाणा घातला. तसेच यावेळी या परिसरात भाजीविक्रेत्या महिलांनाही शिवीगाळ केली. दारुच्या नशेत राडा घालणाऱ्या एपीआय महादेव भारसाकळे यांना पाहण्यासाठी यावेळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरम्यान, हा प्रकार समजताच वाशिम शहर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी गुरूवार बाजार परिसरात दाखल होत एपीआय महादेव भारसाकळे यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारसाकळे ऐकत नसल्यामुळे पोलिसांना चांगलेच परिश्रम घ्यावे लागले. हा प्रकार समोर आल्यानंतर वाशिम पोलीस दलावर सर्व स्तरातून टीका होत आहे. तसेच दारुच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या एपीआय महादेव भारसाकळे यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :
Video | माणसाने जिंवत साप पकडला अन् नाकात टाकला, पुढे काय झालं ? एकदा पाहाच
Photo : पाहावं ते नवलंच.., पाहा झोम्बीच्या हातासारख्या फंगसची दुर्मिळ प्रजाती
(Washim API Mahadev Bharasakle got drunk and used abusive word against women)