मुंबई : नंदुरबार (Nandurbar) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठा कमी झालायं. यामुळे मनपा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून आजपासून शहरामध्ये दोन दिवस आड करून पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाळा सुरू होऊन जवळजवळ महिना उलटत आला आहे. मात्र, पाहिजे तसा पाऊस (Rain) न झाल्याने आता नंदुरबारकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. नंदुरबार शहरासोबतच जिल्ह्यात देखील पाणीकपातीचे संकट आहे. जिल्ह्यातील चार मध्यम आणि 12 लघु प्रकल्पही ठणठणाट झाले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत धरणातील पाणीसाठा वाढत नाही तोपर्यंत दोन दिवसाआड पाणीपुरवठा (Water supply) केला जाणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
शहरातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आव्हान मनपा प्रशासनाकडून करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 38 मिलिमीटर पाऊस झाल्याची शासकीय नोंद आहे. 59 मि.मी अक्कलकुवा, 42 मि.मी शहादा, 38 मि.मी नंदुरबार, 21 मि.मी नवापूर, 16 मि.मी धडगाव, 14 मि.मी तळोदा नंदुबार शहराला पाणीपुरवठा करणारे विरचक धरणांमध्ये अवघ्या 18 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पेरणी देखील खोळंबली आहे ृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेला आहे की 75 ते 100 मिलिमीटर पर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत कुठलाही शेतकर्यांनी पेरणी करू नये.
जवळपास महिना उलटून गेला असला तरी देखील 75 ते 100 मिलिमीटर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. त्यामुळे मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. राज्यामधील अनेक शहरांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावलीयं. मात्र, नंदुरबार जिल्हाकडे यंदा पावसाने पाठ फिरवल्याचे दिसते आहे. मान्सून राज्यात दाखल होऊन जवळपास महिना झाला आहे, इतर जिल्हातील शेतकऱ्यांनी पेरणी करून घेतलीयं. मात्र, पाऊस कमी असल्याने नंदुरबार जिल्हातील शेतकऱ्यांना अद्याप पेरणी करता आली नाहीये.