सातारा : साताऱ्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना नागरिकांना आणि प्रशासनाला त्याचं गांभीर्य आहे की नाही, असा सवाल उपस्थित करण्याचं कारण म्हणजे नागरिकांचा आतातायीपणा आणि प्रशासनाची बघ्याची भूमिका… फलटणमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत जैन सोशल ग्रुपचा पदग्रहन समारंभ पार पडला. प्रशासनाने मात्र या सोहळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येताना प्रशासनाला सामान्य नागरिकांवर कठोर निर्बंध घालावे लागत आहेत. सद्या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण फलटण तालुक्यात आढळत असल्याने प्रशासनाची डोके दुःखी वाढत आहे. असे असताना फलटण येथील जैन सोशल ग्रुप ने शनिवारी विकेंड लॉकडाऊन दिवशी चक्क पत्रिका छापून हा पदग्रहन सोहळा पार पाडला..
पिंपरद या गावात शेकडो लोक गोळा करून हा सोहळा पार पडला. या मध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळले गेलेले नाही. कोणाच्याही तोंडाला साधा मास्क सुद्धा नव्हता.
फलटणमध्ये व्यापारी वर्गाचा या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या ग्रुपला ही सूट कोणी दिली याची चर्चा आता चांगलीच रंगलेली आहे. एखाद्या गरिबाचं लग्न किंवा कार्यक्रम असला की त्यावर करडी नजर ठेवणारे प्रशासन या बाबतीत आता गप्प का?,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात बैलगाडी शर्यतींवर बंदी आहे तरी सुद्धा सातारा जिल्ह्यातील मायणी परिसरात बैलगाडी शर्यतींचा अक्षरशः धुरळा उडाला आहे. या शर्यतींवर बंदी असून सुद्धा शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये या शर्यती पार पडत आहेत. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असताना प्रशासन मात्र आजून ढिम्मच आहे.
एकीकडे सामान्य जनता लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळत असताना दुसरीकडे अशा शर्यतींच्या माध्यमातून शेकडो लोकं एकत्र येऊन सर्व नियम पायदळी तुडवत आहेत. विशेष म्हणजे मागील आठवड्यात मायणी पोलीस प्रशासनापासून अवघ्या 5 किमी अंतरावर पार पडणाऱ्या बैलगाडा शर्यतींकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(Weekend Lockdown Rules And Regulation Violation in Phaltan Satara Jain Group)
हे ही वाचा :
बंदी असूनही साताऱ्यात बैलगाडा शर्यतीचा धुराळा, लाखो रुपयांची उलाढाल, प्रशासन हातावर हात ठेऊन गप्प!