Buldana tree | शेगाव तालुक्यात रस्त्यावरील वृक्षांचा वाली कोण? आग लावून वृक्षतोडीचे प्रकार वाढलेत

| Updated on: May 05, 2022 | 9:33 AM

राज्य व राष्ट्रीय महामार्गासह इतर रस्त्यांवर महाकाय असलेल्या कडुनिंब, चिंच आदी वृक्षांच्या बुंध्याला कचरा जमा करून जाळण्यात येतो. यामुळे हळुहळू झाडाचा बुंधा जळतो. बुंधा जळाला म्हणजे झाड कमजोर होते आणि ते पाडण्यायोग्य करण्यात येते.

Buldana tree | शेगाव तालुक्यात रस्त्यावरील वृक्षांचा वाली कोण? आग लावून वृक्षतोडीचे प्रकार वाढलेत
आग लावून वृक्षतोडीचे प्रकार वाढलेत
Image Credit source: t v 9
Follow us on

बुलडाणा : वृक्ष संवर्धनाच्या (tree conservation) नावाखाली खर्च होत असतो. मात्र प्रत्यक्षात जे वृक्ष आहेत त्यांना टिकविण्यासाठी फारसे प्रयत्न केले जाताना दिसत नाही. उलट त्यांचेही वेगवेगळ्या मार्गाने अस्तित्त्व संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवीन लागवड होतेय. मात्र ती प्रत्यक्षात कुठेही दिसून येत नाही. वृक्ष तोडीसाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्या या वृक्षाची दुरावस्था झाल्याची कारणे न शोधताच दिल्या जातात. बुलडाणा (Buldana) जिल्ह्यात वृक्ष तोडीसाठी झाडांच्या बुंदाला आग लावली जात आहे. रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेल्या महाकाय वृक्षांचा कोणीही वाली राहिला नाही. रस्त्याशेजारील या वृक्षांना तोडण्यायोग्य बनविण्यासाठी काही लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवतात. आधी झाडाचा बुंदा जाळून जीव घेत आहेत. झाड वाळले की मग ते तोडले जात आहे. अशा प्रकारे वृक्षांना जीर्ण करून मारण्याच्या प्रकारांमुळे मार्गावरील अनेक झाडे तोडली (tree felling) गेली आहेत. शेगाव तालुक्यातील बहुतांशी रस्त्यावर हा प्रकार सर्रास सुरु आहे.

वृक्षांना पंगू केलं जातंय

महाकाय निरोगी म्हटले जाणारे कडुनिंबाचे वृक्षही रोगाने ग्रस्त झाले आहेत. रोग कसा निर्माण करावा व त्यासाठी काय उपाययोजना कराव्या हेही आता वृक्षतोड करणाऱ्यांना माहीत झाले आहे. झाडे कापण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी काय कारण दाखवले म्हणजे मिळते. ते कारण कसे निर्माण करावे हे त्यांना कळून चुकले आहे. गावातील वृक्षांची अशी अवस्था होत नाही. मात्र महामार्गावर किंवा इतर रस्त्यांवर असणाऱ्या वृक्षांची अशी अवस्था का होतेय. हा संशोधनाचा भाग असला तरी बुलडाणा जिल्ह्यातील हा प्रकार सर्रास सुरु आहे.

बुंद्याजवळ कचरा जमा करून जाळतात

राज्य व राष्ट्रीय महामार्गासह इतर रस्त्यांवर महाकाय असलेल्या कडुनिंब, चिंच आदी वृक्षांच्या बुंध्याला कचरा जमा करून जाळण्यात येतो. यामुळे हळुहळू झाडाचा बुंधा जळतो. बुंधा जळाला म्हणजे झाड कमजोर होते आणि ते पाडण्यायोग्य करण्यात येते. काही ठिकाणी झाडाचा जॉइंटचा भाग पाहून त्याला पोकळ केले जाते. पोकळ झाल्यावर त्यामध्ये कचरा भरला जातो आणि त्याला पेटवून दिल्या जात आहे.

हे सुद्धा वाचा