अकोला : किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) झालेल्या हल्ल्यावर शिवसेना नेते सचिन अहीर (Sachin Ahir) बोललेत. ते अकोल्यात म्हणाले, आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडलेली आहे. अकोला असेल किंवा अमरावती या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी (Lok Pratinidhi) लोकांचे प्रश्न घेऊन मांडले पाहिजे. ते आज हनुमान चालीसा घेऊन भांडत आहेत. त्यात बघीतलं तर भोंगा कोणाचा आज हनुमान चालीसा कोण बोलतेय, कोण याच्यातूनच स्पष्ट होत आहे. कुठेतरी प्रसिद्धी मिळावी यासाठी असे स्टंट करण्यात येतात. विशेषता शिवसेनेला हिंदुत्व सांगण्याची गरज नाही. आणि या सर्व घटनांचा आढावा घेतला तर कळेल की याचे सर्व बोलते धनी दुसरेच आहेत. हे आता जनतेसमोर स्पष्ट परत भाजपला टोला लगावला आहे. ते आज गवळी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्या निमित्त अकोल्यात आले होते.
सचिन अहीर म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी राणा प्रकरणी शिवसेनेची भूमिका मांडली आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम पाहणं आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न घेऊन भांडले पाहिजे. काही लोकं आज हनुमान चालीसा घेऊन भांडण्याचा प्रयत्न करत आहेत. भोंगा कोणाचा आणि हनुमान चालीसा कोण बोलतोय, हे आता यातून स्पष्ट दिसतंय. स्थानिक लोकांचे प्रश्न सोडविण्याची भूमिका घेतली जाते. पण, काही लोकं आपली प्रसिद्धी मिळविण्यासाठी असे प्रयत्न केले जात आहेत. खरं तर लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे. हिंदुत्वाची भावना त्यांच्या मनात आज प्रकट झाली. या लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन निवडूण आले होते. त्यावेळी त्यांची हिंदुत्वाची भूमिका कुठं गेली. याचा अर्थ असं आहे की, हे स्टंट दाखविण्याचं काम करताहेत.
शिवसेनेला हिंदुत्व सांगण्याची कुणाला गरज नाही. किरीट सोमय्या यांच्यावरील झालेली घटना टाळता आली असती. पण, यापूर्वीच्या घटनांचा विचार करावा लागेल. भाजपचा कट असल्याचा आरोपही सचिन अहीर यांनी केला. भोंगा कुणाचा, वाचवतोय कोण, याचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोघांच्या नावांचा उल्लेख नवनीत राणा यांनी केला. आता त्या राणे आणि फडणवीस यांची मदत मागतात, याचा अर्थ काय असा सवाल सचिन अहीर यांनी विचारला.