चंद्रपुरातील आजचं तापमान 44 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आलंय. उद्या हे तापमान 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाईल, असा हवामान खात्याचा अंदाज (Weather Forecast) आहे. अकोल्यातील तापमान हे 43 डिग्री सेल्सिअसपर्यंत आज वाढलं. नागपूरचं तापमान हे 42 डिग्री सेल्सिअस (Degree Celsius) होतं. नागपूर आणि चंद्रपूर ही दोन्ही शहर फार दूर नाहीत. तरीही तापमानात दोन डिग्री सेल्सिअसचा फरक कसा, या मागची कारण जाणून घेऊ. यासाठी प्रा. सुरेश चोपणे (Suresh Chopne) यांच्याकडून माहिती घेतली.
चंद्रपूर हे औद्योगिक शहर आहे. कारण या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशन आहे. चंद्रपुरातली ही औद्योगिकरणाची हिट आहे. त्यामुळं शहराचे तापमान जास्त आहे. पूर्व व उत्तर भागात जंगल असलं, तर शहराच्या सिमेंट क्राँक्रिटीकरणामुळं तापमानात वाढ होते.
औद्योगिकरणामुळं प्रदूषणात भर पडली आहे. शहरालगत कोळसा खाणी आहेत. याच्या प्रदूषणामुळंही चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक असते. प्रदूषण हे तापमान वाढीचं एक महत्त्वाचं कारण आहे, असं पर्यावरण तज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितलं.
नियमानुसार, हवामान केंद्र शहरात नसावं. पण, चंद्रपूर, अकोला आणि ब्रम्हपुरी येथील हवामान केंद्र शहरात आहेत. त्यामुळं येथील तापमान जास्त दाखविलं जातं. चंद्रपूरचं हवामान केंद्र शहरातली हिट दाखविते. नागपुरात हवामान केंद्र सोनेगावला आहे. त्यामुळं तुलनेत नागपूरचं तापमान कमी दाखविते.
गुजरात, राजस्थानचे तापमान वाढले की, विदर्भात हिट वेव्ह येते. सध्या ही हिट वेव्ह आहे. त्यामुळं तापमान जास्त आहे. कारण या हिट वेव्हचा परिणाम आहे. हिट वेव्ह कमी झाली की, तापमान कमी होईल. चंद्रपुरात सूर्य 20 -21 मे रोजी डोक्यावर असतं. या कालावधित चंद्रपूरचं तापमान सर्वाधिक असतं.
तापमान मोजताना तिथं सिमेंट क्राँक्रिटीकरण नको. पण, चंद्रपूर, अकोला येथील हवामान केंद्र हे गवताळ जागेत नाहीत. आजूबाजूचा परिसर हा सिमेंटीकरण आहे. त्यामुळं या ठिकाणचं तापमान जास्त दाखविलं जातं. तुलनेत जी हवामान केंद्र शहरापासून दूर असतात. तिथंल तापमान कमी असतं.