नांदेड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज नांदेडमध्ये होते. रामानंद तीर्थ विद्यापीठाने नितीन गडकरी यांना डिलीट पदवी दिली. ती स्वीकारण्यासाठी ते येथे आले होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, मराठवाड्याची भूमी ही संघर्षाची भूमी आहे. सामाजिक, साहित्यिक, असे ऐतिहासिक असं हे नांदेड शहर आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ डिलीट देते आहे. विनम्रपणे ही डिग्री स्वीकारत आहे. त्यांच्या नावानं असलेल्या या विद्यापीठाची पाचवी डिलीट पदवी आहे. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पंजाबराव देशमुख अकोला कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ आणि तामिळनाडूतील एसआरएल विद्यापीठाने आतापर्यंत डिलीट पदवी दिली आहे. याशिवाय मार्चमध्ये नोएडा येथील विद्यापीठाकडून डिलीट मिळणार आहे. ही पदवी स्वीकारत असताना मनात ही भावना आहे. मी पात्रतेचा आहे की, नाही. मी या पात्रतेचा नाही, असं मला वाटते म्हणून डॉक्टर हे नाव लावण्यात मला संकोच होत असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं. यावेळी कमलकिशोर कदम यांना डिलीट देण्यात आली.
नितीन गडकरी म्हणाले, मी हेलिकॉप्टरने येताना वाशिम-बुलढाणा येथून आलो. मला कोरडा दिसला आणि नांदेड आलं की पाणीच पाणी दिसलंय. देशात पाण्याची कमतरता नाही. पण ते जिरवायला हवं. विद्यापीठातही पाणी जिरवायला हवं, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते म्हणाले, आज शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. कारण शेतमालाला भाव मिळत नाही. अन्नदाता हा ऊर्जादाता बनायला हवा. तरुणांमध्ये ताकत आहे. त्यातून आपला देश महासत्ता बनू शकतो. विदेशात डॉक्टर, इंजिनिअर भारतातील सर्वाधिक आहेत.
युवकांना व्यावसायिक ज्ञान असावे. राहायला घर नाही, त्याला केंद्रबिंदू मानून आर्थिक, सामाजिक परिवर्तन केलं पाहिजे. देश समृद्धी सुखी झाला पाहिजे. गावं समृद्ध करा. रामानंद तीर्थ यांचं पवित्र असलेलं हे गाव. मनुष्यासाठी मरणाचा मनुष्य असतो. समाजातील शोषित पीडित केंद्रस्थानी मानून काम करा, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला. माणूस जातीने नाही गुणाने मोठा असतो. मानवतेच्या आधारावर मुल्यांकन झालं पाहिजे. देश जगाची महाशक्ती बनली पाहिजे. अनिल काकोडकर हे अणूबाँबचे जनक आहेत. देशात सगळ्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. कौशल्य विकास झाला पाहिजे. माणूस घडवणारे व्यक्ती बना. वेल्थ क्रियटर बना अशा शुभेच्छाही नितीन गडकरी यांनी युवकांना दिल्या.