नालासोपारा : नालासोपाऱ्यात भर रस्त्यात जमावाकडून एका महिलेला मारहाण (Beating) केल्याची घटना घडली आहे. नालासोपारा पूर्व ओसवाल नगरी सेंटर पार्क रस्त्यावरील रविवार बाजारात आज सायंकाळी 6:30 च्या सुमारासची ही घटना घडली. संबंधित महिलेने बाजारात गर्दीचा फायदा घेऊन पाकिट (Wallet) चोरल्याचा तिच्यावर आरोप लावण्यात आला आहे. तुळिंज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन महिलेला ताब्यात घेतले असता महिलेने पोलिसांसोबत देखील हातापाई करत नख मारली असल्याचे समोर आले आहे. (Woman beaten by mob in Nalasopara on suspicion of stealing wallet)
पोलीस कर्मचार्याच्या हाताला व पायाला महिलेची नख लागली आहेत. नागरिकांच्या आरोपावरून सदर महिलेला तुळिंज पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे ही महिला चोरच आहे की या मारहाणी पाठिमागे अन्य काही कारण आहे हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. भर बाजारात महिलेला मारहाण होताना बघ्यांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात झाली होती.
गावात सुरु असलेल्या विकास कामांच्या जागेवरील वाळू उचलून नेत असताना हटकले असता सरपंचाला शिवीगाळ करीत दगड डोक्यात घालून जखमी केल्याची घटना वर्ध्यातील वायफड येथे घडली आहे. विजय रामदास राऊत (27) असे जखमी सरपंचाचे नाव आहे. गावात रस्त्याच्या बांधकामासाठी वाळू आणून ती रस्त्याकडेला कंत्राटदाराने ठेवली होती. आरोपी अरुण बावणे हा रस्त्याकडेला ठेवलेली वाळू चोरून नेत होता. सरपंच विजय राऊत यांनी त्याला पाहिले असता त्याला हटकले. यावेळी आरोपीने त्यांना शिवीगाळ करून प्लास्टिक टोपल्याने आणि दगडाने डोक्यावर मारहाण करीत जखमी केले. याबाबत पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Woman beaten by mob in Nalasopara on suspicion of stealing wallet)
इतर बातम्या
Video : मालेगावातील सटाणा रोडचा डेंजर झोन, एकाच ठिकाणी 3 दिवसात 3 अपघात, अपघाताची दृश्य CCTV त कैद
Mumbai ATM Loot : गोरेगावमधील एसबीआयचे एटीएम लुटणाऱ्या दोघांना अटक