इचलकरंजी : सावकारी कर्जाला कंटाळून एका विधवा महिले (Women)ने पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्दैवी घटना इचलकरंजी शहरात घडली आहे. सुजाता चौगुले असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पतीच्या निधनानंतर सुजाता यांनी काहीतरी उद्योगधंदा करण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेतले होते. या पैशसाठी सावकाराने वारंवार तगादा लावला होता. कर्ज फेडता येत नसल्याने सावकाराने घर खाली करण्यास सांगितले. याच विवंचनेतून सुजाता चौगुले यांनी पंचगंगा नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. (Woman commits suicide due to debt, ended her life by jumping into the river Panchganga)
मयत सुजाता चौगुले यांच्या पतीचे तीन वर्षापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी सुजाता यांनी काहीतरी कामधंदा करण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेतले होते. या बदल्यात त्यांनी आपले घर सावकाराकडे गहाण ठेवले होते. मात्र कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. त्यातच सावकाराकडून पैसे परत करण्यासाठी तगादा सुरु होता. पैसे परत न केल्याने राहते घर खाली करण्यासाठी सावकार दबाव आणत होता. याबाबत सुजाता यांनी आपल्या वडिलांना माहिती दिली होती. वडिलांनी मध्यस्थी करुन सावकाराला समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो काहीही समजून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता. याच कारणाने नैराश्येतून सुजाता चौगुले यांनी पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. नदीत प्रेत तरंगताना पाहिल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि पंचनामा करीत गुन्हा नोंद केला.
मायलेकीच्या प्रेमप्रकरणाला विरोध करीत असल्याने दोघींनी संगनमताने बापाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीतील बर्गे मळा परिसरात घडली आहे. याप्रकरणी गोधी मायलेकीला शिवाजनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शांतिनाथ आण्णाप्पा केटकाळे (40) असे मयत इसमाचे नाव आहे. डोक्यात लोखंडी गज आणि बॅटने मारहाण करीत शांतिनाथ यांची हत्या करण्यात आली. साक्षी केटकाळे असे आरोपी मुलीचे तर सुजाता केटकाळे असे आरोपी पत्नीचे नाव आहे. आई आणि मुलीच्या प्रेमसंबंधावरुन केटकाळे कुटुंबात नेहमी वाद सुरु होते. शांतिनाथ यांनी पत्नी आणि मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्या ऐकायला तयार नव्हत्या. याचमुळे कुटुंबातील वाद विकोपाला गेला आणि मुलगी साक्षीने लोखंडी गजाने वडिलांच्या डोक्यात वार केला. या मारहाणीत शांतिनाथ यांचा मृत्यू झाला. (Woman commits suicide due to debt, ended her life by jumping into the river Panchganga)
इतर बातम्या
VIDEO : लुडो गेमवरुन चर्चगेट लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल