अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या भंडारज येथे अवैध धंद्यांना ऊत आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रेत्यांचा धुमाकूळ सुरू आहे. याविरोधात महिलांनी आंदोलन केली. निवेदने दिली. मात्र गावातील दारू बंद झाली नाही. अखेर महिलांनी गावात दारू साठा घेऊन येणाऱ्याची गाडीसह दारुची पेटी ( liquor box with car) पेटवत एल्गार केला. आगामी सण, उत्सव असल्याने गावात शांतता नांदावी (Peace be upon you) त्यासाठी महिलांनी थेट संतप्त झाल्या. दारू विक्रेत्याची दारूसह गाडी पेटवून दिली. वाढत्या अवैध धंद्यामुळे गावात अशांतता निर्माण झाली आहे. अनेकांचे दारूच्या व्यसनापायी संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पोलिसांच्या आशीर्वादमुळे (police blessings) येथे अवैध धंद्यांना ऊत आल्याचा आरोप महिलांनी केलाय.
दारुपायी कित्तेक संसार उद्ध्वस्त झाले. पण, पिणारे काही सुधरेणा. गावात शांतता राहावी, राम नामाचा जप व्हावा, अशी महिलांची इच्छा. मात्र, मद्यपींमध्ये काही सुधारणा होत नव्हती. विक्रेत्याला महिलांनी बजावले. आमच्या संसारात विष कालवू नको, असं वारंवार सांगितलं. पण, तोही एकेचिना. शेवटी महिलांना एल्गार फुकारला.
दारुसाठी घेऊन येणारी गाडी पेटविली
दारुसाठी घेऊन येणारी गाडी महिलांनी थांबविली. काही महिला एकत्र आल्याने त्यांना हिंमत आली. हा विक्रेता आपले काय बिघडविणार, असं त्यांना वाटले. विक्रेत्याची गाडी थांबविली. माचीसची काडी काढली. गाडी पेटविली. गाडीसोबत दारूही पेटविली. गाडी पेटून राख झाली. तेव्हा कुठे महिला शांत झाल्या. यानंतर दारु विकल्यास तुलाही पेटवू अशी धमकीच या महिलांनी दिली. या रणरागिणींचा अवतार पाहून मद्यपींना चांगलीच धडकी भरली.