अमरावती : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मध्यस्थी केल्याने तब्बल 48 कामगारांचा रोजगार वाचला आहे. अमरावती जिल्ह्यातील आपला नियोजित दौरा आटोपून यशोमती ठाकूर परतत असताना नांदगाव पेठ MIDC मध्ये काँग्रेसच्या कामगार सेलचे अध्यक्ष पंकज शेंडे यांच्या नेतृत्वाखाली काही कामगारांचे आंदोलन सुरू असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचल्या. कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करुन यशोमती ठाकूर यांनी 48 तरुणांची नोकरी वाचवली आहे.
सुदर्शन जिन्स नावाच्या एका कंपनीने 48 स्थानिक कामगारांना कामावरुन काढून टाकल्याने आंदोलन सुरू असल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनाची तातडीने दखल घेत मंत्री यशोमती ठाकूर यांनी कंपनी प्रशासनाला त्याच आंदोलनाच्या ठिकाणी बोलावले. तसेच 8 दिवस कामावर आले नाही म्हणून 48 कामगारांना कामावरुन काढता येणार नाही, असे बजावले.
कंपनी व्यवस्थापनाला तातडीने या कामगारांना कामावर परत घेण्याची सूचना यशोमती ठाकूर यांनी केली. कंपनीने कामगार कायद्याचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले. पण त्याचबरोबर 8 दिवस न येणाऱ्या कामगारांनाही अशाप्रकारे सुटी घेणे चुकीचे असल्याचे सांगत यशोमती ठाकूर या वादावर आंदोलनाच्या ठिकाणीच तोडगा काढला.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील वऱ्हा गावांमध्ये चक्रीवादळामुळे 61 घरांचे नुकसान आणि पडझड झालं होतं. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली या पाहणीनंतर त्यांनी प्रशासनाला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पंचनामे करून सानुग्रह अनुदान देण्याचेही निर्देश दिलेत. दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी नुकसानग्रस्तांना अन्नधान्य वाटप करून मदतीचा हातही दिला. तसेच या भागातील नुकसान ग्रस्तांची पाहणी करून त्यांचे योग्य ते पंचनामे करण्याचे आदेश ठाकूर यांनी प्रशासनाला दिले आहेत. हे पंचनामे लवकरात लवकर करून संबंधितांना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
इतर बातम्या:
कुठल्याही परिस्थितीत 5200 पदं तातडीने भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा, एकूण 12200 पदांची भरती
(Yashomati Thakur save job of forty eight workers of company in Amravati)