तुला तर गाढवावर बसवलं नाही ना, संजय कदम यांचा रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल

| Updated on: Jan 07, 2023 | 9:49 PM

कुत्र्याचा फोटो घालून रामदास कदमांचा फोटो. गाढवाचा फोटो दाखवून रामदास कदम यांचा फोटो अशी आंदोलनं झाली. त्याचे चित्रीकरण त्यांनी दाखविले होते.

तुला तर गाढवावर बसवलं नाही ना, संजय कदम यांचा रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल
संजय कदम
Follow us on

रत्नागिरी : गाढवावर फोटोची धिंड काढल्याप्रकरणी रामदास कदम यांनी आंदोलकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्याप्रकरणी एक टीव्ही चॅनलच्या पत्रकाराला अटक करण्यात आली. संजय कदम यांनी अटक वारंट रद्द करून घेतला. याच प्रकरणी आधी माफी मागणाऱ्या रामदास कदम यांनी आता अटक का करून घेतली, असा सवाल संजय कदम यांनी विचारला. रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली आहे. आता डुप्टिकेट सेनेचे ते नेते आहेत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार संजय कदम यांनी केली.

रामदास कदम हे पर्यावरण मंत्री होते. त्या काळात माशांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं. आंदोलन करण्यात आलं. मदत झाली पाहिजे, अशा घोषणा दिल्या होत्या. गाढवावर बसलेला कार्यकर्ता हा माझ्यासारखा होता. त्यामुळं माझी बदनामी झाल्याचं रामदास कदम यांनी म्हंटलं होतं. त्यामुळं बोरीवली कोर्टात खटला दाखल केला.

मला आरोपी केलं. त्यामुळं मी खेडमध्ये असताना पहाटे पाच वाजता पोलीस आले. संजय कदमला अटक करतो, असा रामदास कदम आधल्या दिवशी ओरडत होता. मी बोरीवली कोर्टात जाऊन वारंट रद्द करून घेतला.

गेल्या तीन-चार तारखेला टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी हजर झाले नाही. मुस्ताकच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली. ते निंदनीय आहे. सगळ्या पक्षांचे मोर्चे दाखविता. कुत्र्याचा फोटो घालून रामदास कदमांचा फोटो. गाढवाचा फोटो दाखवून रामदास कदम यांचा फोटो अशी आंदोलनं झाली. त्याचे चित्रीकरण त्यांनी दाखविले होते.

रामदास कदम यांनी अखेर या प्रकरणी माफी मागितली. मग, आता टीव्हीवर बातमी दिली म्हणून मुस्ताक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं कारण काय, असा सवाल संजय कदम यांनी विचारला.