बुलडाणा : बैल धुण्यासाठी तलावावर गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज दुपारी जिल्ह्यातील बोरी अडगाव येथे घडली. तरुणाच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आशुतोष निरंजन सुरवाडे असे आहे. (young boy drowned in lake while washing bull in buldhana district)
बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील माजी सरपंच निरंजन सुरवाडे यांचा मोठा मुलगा आशुतोष सुरवाडे बैल धुण्यासाठी गेला होता. सोमवारी पोळा सण असल्याने आज सकाळी बैल धुण्यासाठी गावाशेजारील कारेगाव शिवारातील तलावामध्ये तो मित्रांसोबत गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आशुतोष पाण्यात बुडाल्याचे समजताच त्याला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. लोकांनी आशुतोष यास तातडीने बाहेर काढले. मात्र, आशुतोषचे प्राण वाचू शकले नाही. त्याचे बी ए. पदवी पर्यंत शिक्षण झाले असून आशुतोषच्या पश्चात आई वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. खामगाव येथील सामान्य रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करून मूळगावी बोरी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तर दुकरीकडे रायगड येथील मुरूड येथे काशिद बीचवर मित्रांसोबत फिरायला आलेल्या आणखी एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गौरव सिंग यादव असे तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर येथील रहिवासी आहे. तो सध्या खोपोली येथे कामासाठी आला होता. मित्रांबरोबर काशिद बीचवर फिरायला आलेला असताना हा तरुण समुद्राच्या पाण्यात पोहत होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
इतर बातम्या :
तोक्ते चक्रीवादळावेळी गुजरातला निधी महाराष्ट्राला का नाही?, राजू शेट्टींचा केंद्राला सवाल
Video | जेवताना नवरी-नवरदेवाची मस्ती, मजेदार व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चाhttps://t.co/y5nC7ajdQ6#ViralVideo | #viral | #bride | #groom | #marriage
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 5, 2021
(young boy drowned in lake while washing bull in buldhana district)