मुंबई : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी पहिल्यांदाच शिवसैनिकांमध्ये जाऊन भाषण केलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीच्या ( Matoshri ) बाहेरच गाडीतून कार्यकर्त्याना आव्हान केलं आहे. शिंदे गटाला गद्दार म्हणत थेट शिवसेना ( Shivsena ) वाढविण्याचे आव्हान देत शिवसेना संपणार नाही असा थेट इशाराच शिंदे गटाला दिला आहे. गद्दारांना गाडून शिवसेना वाढवा, कुणाच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही अशी गर्जनाच उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, धनुष्यबाण कुणी चोरलं हे तुम्हाला माहीत आहे. निवडणुकीत या लोकांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. योगायोग असो काही असो आज महाशिवरात्र आहे.
या दिवसांचा महुर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं. धनुष्यबाण चोरलं. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारलं आहे. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याचा स्वाद घेतला आहे. पण आता त्यांना डंख मारण्याची वेळ आली आहे.
तुम्ही चिडलेला आहे. आजपर्यंत कोणताही पक्ष नसेल की त्यांच्यावर हा आघत कोसळला नसेल. भाजप नेते आणि पंतप्रधानां वाटत असेल यंत्रणा हाताशी घेऊन पक्ष संपवता येईल. पण त्यांच्या किती पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही.
माझं आव्हान आहे. निवडणूक आयुक्तांनी काल गुलामी केली. निवृत्त झाल्यावर ते राज्यपाल होतील. न्यायामूर्ती झाले. त्यांनी गुलाम अवतीभवती ठेवले आहे. गुलामांना आव्हान आहे. शिवसेना कुणाची. शिवसेना ही जनतेला ठरवू द्या असं आव्हानही ठाकरे यांनी दिलं आहे.
यांचा डाव सुरू आहे. यांना ठाकरे नाव पाहिजे. बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे. पण ठाकरे कुटुंब नको. त्यावेळी मोदींची नाव घेऊन मते मागितल्याचं सांगत होता. तेव्हा युती होती. एक जमाना होता लोक मोदींचे मुखवटे घालू यायचे.
आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून मते मागावी लागत आहे असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालवा लागतो हा आपला मोठा विजय आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
महाराष्ट्रातील जनतेला असली नकली कोण हे माहीत आहे. आव्हान देतोय ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोरायला दिलं गेलं. आपला धनुष्यबाण चोराला दिला. ज्या पद्धतीने आणि कपट कारस्थानाने सुरू आहे असा आरोपही ठाकरे यांनी केला आहे.
याशिवाय उद्धव ठाकरे यांनी एक भीतीही व्यक्त केली आहे. उद्या मशालही काढतील. माझं आव्हान आहे. धनुष्यबाण चोरणारे मर्द असेल तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते असं आव्हान दिलं आहे.
धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. या चोरांनाही पेलता येणार नाही. हे मी सांगतो. मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्हा आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून आपण त्याच्या छाताडावर उभा राहील असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.