नवी मुंबई : रविवारी सांयकाळी 5 वाजता गुजरात जामनगर ( हापा ) येथून ऑक्सिजन एक्स्प्रेस तीन टॅंकर भरुन प्राणवायु घेऊन रवाना झाली होती. कळंबोली रेल्वे मालधक्का येथे ऑक्सिजन एक्स्प्रेस सकाळी 11 वाजता पोहोचली. या एक्स्प्रेसमधून तीन टॅंकरद्वारे 45 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. ( Oxygen Express reach at Kalamboli Maharashtra which departure from Hapa Gujrat)
कळंबोली येथील रेल्वे मालधक्का येथून पुणे साठी 1 टॅंकर तर मुंबई साठी 2 टँकर महामार्गाने रवाना होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. हे वितरण अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. जिकडे जास्त गरज आहे तिकडे हे तीन ही टँकर पाठवण्यात येतील अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून मिळाली आहे. नुकत्याचं मिळालेल्या माहितीनुसार तीनही टँकर मुंबई मनपाला पाठवन्याचा विचार अन्न व औषध प्रशासन करत आहे.
महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता भरुन काढण्यासाठी राज्य शासनाकडून भारतीय रेल्वेच्या मदतीने इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्यात येत आहे . त्यानुसार कळंबेली येथून 19 एप्रिल रोजी विशाखापट्टणम येथे ऑक्सिजनसाठी रेल्वे रवाना झाली होती. ही मोहीम यशस्वी झाली होती. त्यानुसार नागपूर व नाशिकसाठी 7 टॅंकरद्वारे 105 मेट्रीक टन प्राणवायू मिळाला होता. रेल्वेकडून इतर राज्यातून ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवत महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणले जात आहेत.
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/sCqWdf8CQq
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 26, 2021
आज आलेले तीन टँकर पैकी 2 टॅंकर हवाईमार्गे गुजरात ला नेण्यात आले होते. आज पनवेलच्या कळंबोली येथे ऑक्सिजन एक्स्प्रेस मधून तीन टँकर ऑक्सिजन मिळाला आहे. मात्र, आता दुसरी ऑक्सिजन एक्सप्रेस कधी रवाना होईल याबाबत कुठलीही माहिती अद्याप मिळाली नाही.
पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपूरमध्ये दाखल झाली. विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या 7 (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्स्प्रेस आली होती. त्यातील 3 टँकर नागपूरमध्ये तर उर्वरित नाशिकला देण्यात आलेत.
संबंधित बातम्या:
VIDEO: महाराष्ट्रासाठी गुजरातमधून ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना, स्वतः पीयूष गोयल यांच्याकडून माहिती
Oxygen Crisis: आता केवळ वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा, केंद्राचा आदेश जारी
( Oxygen Express reach at Kalamboli Maharashtra which departure from Hapa Gujrat)