पालघरला कोरोनाचा विळखा, आश्रमशाळेतील 37 विद्यार्थ्यांना लागण

| Updated on: Mar 12, 2021 | 8:18 AM

पालघरमध्ये एकाच वेळेत 40 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. (Palghar 37 School Student Corona Positive)

पालघरला कोरोनाचा विळखा, आश्रमशाळेतील 37 विद्यार्थ्यांना लागण
coronavirus
Follow us on

पालघर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पालघरमधील एका आश्रमशाळेतील 37 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. दरम्यान याआधीही ग्रामीण भागातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. (Palghar 37 School Student Tested Corona Positive)

पालघरच्या ग्रामीण भागातील आश्रमशाळेत कोरोनाचा शिरकाव पाहायला मिळत आहे. जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथे एक आश्रम शाळा आहे. या आश्रम शाळेतील 40 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात 37 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांचा समावेश आहे. यामुळे प्रशासनासह आदिवासी विकास प्रकल्पाची डोकेदुखी वाढली आहे.

पालघरमध्ये एकाच वेळेत 40 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. या सर्वांवर जव्हारमधील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जव्हार तालुका आरोग्य कर्मचारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

पालघरमध्ये 823 कोरोना रुग्ण

पालघरमध्ये काल दिवसभरात 64 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पालघरमध्ये एकूण 49 हजार 612 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 47 हजार 840 रुग्ण बरे झाले आहेत. यातील 939 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पालघरमध्ये 823 कोरोना रुग्ण आहेत.

लातूरमध्ये 40 विद्यार्थ्यांना कोरोना

दरम्यान लातूर शहरातल्या एमआयडीसी भागात असलेल्या पब्लिक शाळेच्या वसतिगृहातील शाळेत तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. 40 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं समोर आल्याने 320 विद्यार्थी, 10 शिक्षक, 20 कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत.

लातूरच्या एमआयडीसी भागात एक सीबीएसई स्कूल आहे. या स्कूलच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीमध्ये कोरोनाची पहिल्यांदा लक्षणे आढळली. त्या नंतर इतर विद्यार्थ्यांची तपासणी केली असता तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या विद्यार्थ्यांवर लातूरच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरु आहे.

राज्यात 14 हजार 317 कोरोनाबाधित 

दरम्यान आज राज्यात 14 हजार 317 नवीन रुग्ण साडल्यानंतर आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 22,66,374 झाली आहे. राज्यात आज 57 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.32 % एवढा झाला आहे. राज्यात आज 7,193 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 21,06,400 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.94 % एवढे झाले आहे. (Palghar 37 School Student Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

Panvel Corona | कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण, पनवेलची सद्यस्थिती काय?

धोका वाढला! राज्यात आज 14 हजार 317 कोरोना बाधित सापडले