पालघर : ऐन होळीच्या रात्री घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरमधील ब्राह्मण पाड्यात लागलेल्या आगीच वृद्ध सासू, सून आणि दोघा नातवंडांचा मृत्यू झाला. मुलगा आणि दोघं नातवंडं आगीत जखमी झाले आहेत. (Palghar Mokhada fire kills four member of family)
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ब्राह्मण पाडा या गावात रविवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. अनंता मोळे यांच्या घराला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी घरात एकूण सात जण होते.
पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केलं. घरमालक अनंता मोळे, त्यांची चार मुलं, पत्नी आणि वृद्ध आई आगीत अडकले. या घटनेत अनंता मोळे यांची दोन मुलं, आई आणि पत्नीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आगीच्या घटनेत अनंता मोळे आणि दोन मुलं बचावली आहेत. नाशिक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत
मृत्यू झालेल्या रहिवाशांची नावे
1. आई – गंगुबाई मोळे, वय वर्षे 78
2. पत्नी – द्वारका अनंता मोळे, वय वर्षे 46
3. मुलगी – पल्लवी अनंता मोळे, वय वर्षे 15
4. मुलगा – कृष्णा अनंता मोळे, वय वर्षे 10
नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरु
1. अनंता मोळे
2. मुलगी – अश्विनी अनंता मोळे, वय वर्षे 17
3. मुलगा- भावेश अनंता मोळे, वय वर्षे 12
(Palghar Mokhada fire kills family)
पालघरजवळ कंटेनर पेटला
मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी निघालेला कंटेनर अर्ध्या रस्त्यातच पेटल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर भागात कंटेनर चालकाला कंटेनरमधून धूर निघत असल्याचं लक्षात आलं. त्याने तत्परता दाखवत कंटेनर चिल्लार फाट्याजवळ सर्व्हिस रोडवर थांबवला. कंटेनर बाजूला उभा करुन पाहिलं असता कंटेनरमधील आलिशान गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं दिसलं होतं. कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, व्हॉल्वो कंपनीच्या तीन महागड्या गाड्या जळून खाक झाल्या.
संबंधित बातम्या :
पालघरजवळ कंटेनर पेटला, कोट्यवधींच्या तीन आलिशान कार जळून खाक
(Palghar Mokhada fire kills four member of family)