अजित पवार अचानकपणे गायब झाल्याच्या चर्चांना उधाण; भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

| Updated on: May 16, 2024 | 8:26 PM

Sudhir Mungantiwar on Ajit Pawar Sharad Pawar Uddhav Thackeray : अजित पवार प्रचारसभांमधून अचानकपणे गायब झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यावर भाजप नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चांवर भाष्य केलंय. ते नेमकं काय म्हणाले? वाचा...

अजित पवार अचानकपणे गायब झाल्याच्या चर्चांना उधाण; भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...
Follow us on

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशात ठिकठिकाणी प्रचारसभा होत आहे. राजकीय नेत्यांची भाषणं होत आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रॅली झाली. या रॅलीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर अजित पवार अचानक गायब झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या चर्चांना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलंय. अजित दादा कमी ठिकाणी प्रचाराला गेल्याची हूल उडवणाऱ्यांची कीव येत आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार प्रचारात कुठेही कमी पडले नाहीत, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

भाजप 5 जून रोजी फूटणार असून नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर राहणार नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टिकेला सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. मोदी पंतप्रधान होणार नाहीत आणि भाजप पक्ष फुटणार हे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. अश्या टीका थांबवता येत नाहीत. सत्ता येणार असल्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये खाते वाटप सुरू झाल्याचं सांगत खात्यांवरून भांडणंही सुरू झाल्याचा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. तर पाच जूनपर्यंत त्यांना आनंदात राहू द्या. ये पब्लिक हे सब जानती है, महायुतीचा विजय निश्चितपणे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीवर निशाणा

महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी मधील कोणीही पंतप्रधान पदाच्या उमेदवारा बद्दल बोलत नाही. पहिल्यांदा गुणपत्रिका द्या नंतर आम्ही उत्तर पत्रिका देऊ अशी अवस्था आहे. प्रधानमंत्री पदा उमेदवारा बाबत भीती आहे.इंडिया फुटण्याची शक्यता असल्याने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करत नाहीत, असंही मुनगंटीवार म्हणाले.

सत्ता येणार नसल्याचे लक्षात आल्याने प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करण्याचा नवीन विचार पुढे आला आहे. आपण सर्व एकत्र आलो तरीही मोदीजींचा पराभव करणे शक्य नाही, म्हणून त्यांनी असा निर्णय केला आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणालेत.