संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीनगरीकडे मार्गस्थ झालेली आहे. वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. अशात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पंढरपूरमध्ये आहेत. ते तिथला आढवा घेत आहेत. कोविड आला, त्यावेळेस वाटलं होतं की वारी नावाचा प्रकार संपेल… परंतू कोविडमुळे वारीत काही फरक पडला नाही. पाऊस चांगला झाल्यामुळे यावर्षी आषाढी यात्रेला 18 लाखाच्या वर भाविक येतील असा अंदाज आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून मी या वारकऱ्यांच्या सर्व सोयी सुविधा व्यवस्थित आहेत का नाही ते पाहण्यासाठी आलो आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेचे नेते राहुल गांधी यांचं नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. उशिरा का होईना देवासमोर नतमस्तक व्हायची इच्छा निर्माण झाली. जसं जसं आपलं वय जाते तस तसे परमेश्वराची आस निर्माण होते. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत अचानक लॉटरी लागली आहे. एकचे 14 खासदार झाले आहेत. त्यामुळे ते हवेत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या 288 जागा काय सुचतात… एकला चलो काय सुचतं ठीक आहे. पण आम्ही मात्र विधानसभेला आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे सध्या मराठवाडा दौरा करत आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील सरकार वारंवार आवाहन करत आहेत. पण सगे सोयऱ्यांची अधिसूचना जी काढली आहे ती जरांगे यांनीच ड्राफ्ट केली आहे. त्या अधिसूचनेला आठ लाख हरकती आले आहेत. तीच अधिसूचना आपण काढत आहोत. या अधिसुचनेमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोठेही धक्का लागणार नाही. 2017 सालिच रक्त संबंधा मध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही. हा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नोंद ज्याची सापडेल त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळेल, असं चंद्रकांत पाटील म्हणले.