सोलापूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी वातावरण तापू लागले आहे. जिल्हाध्यक्षांचा आदेश झुगारत पंढरपुरात राष्ट्रवादीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान पाहायला मिळत आहे. (Pandharpur Mangalwedha constituency by election District President’s order not follow announces NCP elections)
राष्ट्रवादीत अंतर्गत वाद
राष्ट्रवादी काँग्रेसचाचा पंढरपुरातील वाद मिटत नसल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरापासून पंढरपूर तालुका राष्ट्रवादीमध्ये अध्यक्षपद निवडीवरुन घमासान पाहायला मिळत आहे. जिल्हाध्यक्षांचा आदेश झुगारत पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीकडून दीपक पवार यांना पदावरुन हटवत राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंचे समर्थक विजयसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत वाद सुरू झाला होता. हा वाद शमविण्यासाठी जिल्हाध्यक्ष, पक्षनिरीक्षकांनी लेखी पत्र काढत नवीन निवडी न काढण्याचे आदेश दिले होते.
कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याची
मात्र तरीही जिल्हाध्यक्ष, पक्षनिरीक्षक यांचा आदेश झुगारुन विजयसिंह देशमुख यांनी निवडी जाहीर केल्या आहेत. जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पंढरपूरला जाऊन पक्षाचे आदेश येईपर्यंत निवडी न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या
जिल्हाध्यक्षांच्या आदेशानंतरही तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी निवड जाहीर केले आहेत. मावळते अध्यक्ष दीपक पवार यांना हटविल्यानंतर कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याची दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यामुळे येथे लकवरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता लक्षात घेऊन भाजपने राजकीय डावपेच आखाण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी येथील भाजप नेते प्रशांत परिचारक यांच्या गटाची नुकतीच बैठक झाली असून निवडणुकीसाठी योग्य उमेदरवाराची चाचपणी सुरु झालीये. या जागेसाठी भाजप नेते प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांना उमेदवारी देण्याची या बैठकीत मागणी करण्यात आली. त्यामुळे भारत भालके यांच्या मृत्यूनंतर पंढरपूर येथील पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. भाजपने पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
राष्ट्रवादीकडून सर्वेक्षण करुन उमेदवारी दिली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर भाजप उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचं पाठबळ असेल. आमदार-खासदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे राजकीय संकेत बऱ्याचदा पाळले जातात. त्यामुळे भाजप मैदानात न उतरता ही निवडणूक बिनविरोध करणार, की पंढरपुरात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
भारत भालके यांच्या निधनाने राजकीय पोकळी
भारत भालके यांचे 28 नोव्हेंबर 2020 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. (Pandharpur Mangalwedha constituency by election District President’s order not follow announces NCP elections)
संबंधित बातम्या :
भारत भालकेंच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी, राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?