नाशिक : नाशिकरोड परिसरात इंडिया सेक्युरिटी प्रेस मध्ये ऐन सुट्टीच्या दरम्यान कोबरा जातीचा विषारी नाग घुसल्याने प्रेस कामगारांमध्ये मोठी घबराट निर्माण होऊन खळबळ उडाली आहे. दरम्यान काही वेळाने तातडीने सर्पमित्राला बोलावून सदरचा कोब्रा जातीचा विषारी नाग पकडण्यात आला त्यानंतर कामगारांनी सुटकेचा निस्वास सोडलाय. इंडिया सेक्युरिटी प्रेस च्या ब्लॅक गेट जवळ सदरची घटना घडली कामगार जेवणाच्या सुट्टीत बाहेर पडत असताना अचानकपणे कोब्रा जातीचा विषारी नाग घुसला होता. त्यानंतर हा नाग सीआयएसएफ च्या केबिन जवळ गेला, त्यानंतर कामगार आणि सीआयएसएफच्या जवानांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्यानंतर तातडीने सर्पमित्र इंगोले यास पाचारण करण्यात आले. सदर सर्पमित्र इंगोले आणि त्याच्या मित्राने यास कोब्रा जातीच्या नागाला बाटलीत जेरबंद केले होते. त्यानंतर मात्र कामगारांनी समाधान व्यक्त केले असून या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कोब्रा नाग दिसल्याने कामगार वर्गात मोठी खळबळ उडाली होती, सर्पमित्राला बोलावून कोब्रा जातीच्या नागाला बाटलीत जेरबंद केले आहे.
सर्पमित्र इंगोले यांनी बाटलीत कोब्रा जातीच्या नागाला पकडून नैसर्गिक आदिवासात सोडून देण्यात आले असून यामुळे सुटकेचा निश्वास सोडला आहे.
नाशिकच्या इंडिया सेक्युरिटी प्रेस मध्ये ऐन सुट्टीच्या दरम्यान कोबरा जातीचा विषारी नाग घुसल्याने प्रेस कामगारांमध्ये मोठी घबराट निर्माण होऊन खळबळ उडाली होती.
इंडिया सेक्युरिटी प्रेस च्या ब्लॅक गेट जवळ सदरची घटना घडली कामगार जेवणाच्या सुट्टीत बाहेर पडत असताना अचानकपणे कोब्रा जातीचा विषारी नाग घुसला होता.
खरंतर कोब्रा जातीचा साप चावल्याने मनुष्याचा जीव जाण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे कोब्रा जातीचा साप अचानक कसा आला याचा तपास केला जात आहे.