भूकंप झाला, आता चांगला पाऊस होणार; किल्लारीच्या धरणीकंपाचा हवाला देत हवामान अभ्यासकाचा दावा

| Updated on: Jul 10, 2024 | 3:33 PM

Panjabrao Dakh Rain Forecast : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी त्यांनी आज पहाटे मराठवाड्यात झालेल्या भूकंपाचा दाखला दिला आहे. भूकंप झाला की मुसळधार पाऊस होतो, असं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे. डख काय म्हणाले? वाचा सविस्तर....

भूकंप झाला, आता चांगला पाऊस होणार; किल्लारीच्या धरणीकंपाचा हवाला देत हवामान अभ्यासकाचा दावा
पावसाचा अंदाज
Follow us on

मराठवाड्यातील अनेक भागात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मराठवाड्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना या पाच जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र त्यानंतर या भागात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले त्यानंतर आता चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. यावेळी किल्लारीमध्ये झालेल्या भूकंपाचा आणि त्यानंतर झालेल्या पावसाचा त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

पंजाबराव डख यांचा पावसाबाबतचा अंदाज काय?

आज सकाळी मराठवाड्यातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस होणार आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. किल्लारीमध्येही आधी भूकंप आल्यानंतर जोरदार पाऊस झाला होता. येणाऱ्या दिवसात परभणीमध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवलाल आहे.

कुठे- कुठे झाला भूकंप?

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. कुठेही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही. नांदेडमध्ये सकाळी 7.14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. 4. 5 रिश्टर तीव्रतेचा धक्का जाणवला. परभणी जिल्ह्यात जाणवलेले सौम्य धक्के जाणवले. भूकंपची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेलं नाही. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीत 4.5 इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी 7.15 वाजता झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घारेगाव एकतूनी, फारोळा ,पांढरे पिंपळगाव, पिंपरीराजा, आडगाव खुर्द या गावांमध्ये भूकंपाचे सौम्ये धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. वसमत परिसरात आतापर्यंत भूकंपाचे एकूण 25 धक्के बसलेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरात ही भूकंपाचे धक्के जाणवले.

वादळ आणि भूकंपाचा संबंध आहे का?

तैवानमध्ये 2010 साली भूकंप आला होता. तो वादळाचा परिणाम असू शकतो, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. युनिवर्सिटी ऑफ मियामीच्या रोसेनस्टील स्कूल ऑफ मरीन अॅन्ड एटमॉस्फेरिक सायन्समध्ये भू-विज्ञान आणि भूभौतिकचे शास्त्रज्ञ शिमोन वाडोविंस्की यांनी या अभ्यास करणाऱ्या टीमचं नेतृत्व केलं होतं. पाऊस हे भूकंपाचं मुख्य कारण असल्याचा दावा त्यांनी या अभ्यासात केला होता.

पावसामुळे भूकंप येऊ शकतो का?

भूकंपशास्त्रज्ञ आणि ‘द बिग ओन्स’च्या लेखिका डॉ. लुसी जोन्स यांनी याबाबतचं संशोधन केलं आहे. जमीनीतील हालचाली आणि हवामानाचा संबंध नसला तरी पावसामुळे भूकंपावर परिणाम होऊ शकतो. एखादा कृत्रिम तलाव बनवला आणि त्याच्या केंद्रीय दाबामुळे भूकंप येऊ शकतो. याला द्रवपदार्थाचा दाब म्हणतात.