यांना आता घरी बसविले पाहिजे, पंकजा मुंडेंची थेट धनंजय मुंडेंवर टीका

| Updated on: Oct 13, 2021 | 4:04 PM

बीड जिल्ह्याची संस्कृती चांगली करण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला होता, कृपया पालकमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही जिल्ह्याची संस्कृती बिघडवू नका. मी दुर्गाष्टमी निमित्त सांगते, माझा कार्यकर्ता तुम्हाला घाबरणार नाही. माझा कार्यकर्ता लाचार नाही. चांगले दिवस परत आणण्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करतोय. आम्ही लढायला पाय रोवून उभे आहोत.

यांना आता घरी बसविले पाहिजे, पंकजा मुंडेंची थेट धनंजय मुंडेंवर टीका
Dhananjay-Munde_Pankaja-Munde
Follow us on

बीडः आता पक्षात येतो का अन्यथा बघू तुला , तुझ्यावर केस करतो अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादीची प्रतिमा काय आहे, दहशत काय आहे, हे शरद पवारांनी देखील पाहिले पाहिजे. चुकीच्या माणसाला पाठीशी घालणे हेदेखील चुकीचे आहे. यांना आता घरी बसविले पाहिजे, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडलंय. बीडमध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या.

तुम्ही जिल्ह्याची संस्कृती बिघडवू नका

बीड जिल्ह्याची संस्कृती चांगली करण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला होता, कृपया पालकमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही जिल्ह्याची संस्कृती बिघडवू नका. मी दुर्गाष्टमी निमित्त सांगते, माझा कार्यकर्ता तुम्हाला घाबरणार नाही. माझा कार्यकर्ता लाचार नाही. चांगले दिवस परत आणण्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करतोय. आम्ही लढायला पाय रोवून उभे आहोत. मुंडे साहेबांनी दुबईच्या गुन्हेगाराला घाबरले नाही, त्या मुंडे साहेबांचं रक्त आमच्या अंगात आहे. दसऱ्याच्या आधी सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या आडून ठाकरे सरकारला इशारा दिलाय.

म्हणून आम्ही जनतेसाठी यांना सवलत दिली

सरकारच्या विरुद्ध आंदोलन करणं हे आमचं विरोधी पक्ष म्हणून दायित्व आहे, आज दुर्गाष्टमी आहे. सत्ताधारी माफिया राज चालवित आहेत, सत्ता प्रस्थापित होऊन दोन वर्षे होत आले, यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही जनतेसाठी यांना सवलत दिली. समाजाचं कल्याण करण्याचं मंत्रिपद मिळाले. पण आम्ही रेमडेसिव्हीरचा काळाबाजार डोळ्यांनी पाहिला, आरोग्य विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगत पंकजा मुंडेंनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय.

तुम्ही सर्व पायदळी तुडविले

अंबाजोगाईची घटना लाजिरवाणी होती, 18 ते 20 मृतदेहाना एकत्रित आणलं. मी लोकांना भेटत नाही असं तुम्ही म्हणत होता, आता तुम्ही कुठं आहेत, जिल्ह्यात आम्ही चांगल्या सवयी लावल्या होत्या, चांगले अधिकारी आणले, तुम्ही सर्व पायदळी तुडविले, मी मोदींच्या काळात 52 हजार कोटी आणला, 992 कोटींचा विमा आणले. मराठवाड्यात आम्हीही चिखल तुडवीत गेलो, अतिवृष्टीची पाहणी केली. सर्वात जास्त कोव्हिड पॉझिटिव्ह हे भाजपचे कार्यकर्ते झाले, कारण कोरोना काळात ते दार लावून बसले नव्हते. पालकमंत्री हातात ग्लोज घालून घरात बसले होते. जयंत पाटील यांच्याबद्दल मला बोलायचा नाही, काय आनंद झाला होता, बीड जिल्ह्यात फटाके फोडले, इथं लोक मरत होते, कोव्हिडमध्ये हजारो मेले, तुम्ही मात्र ओंगळवाणे प्रकार केलात, असं म्हणत पंकजाताईंनी जयंत पाटलांनाही खडे बोल सुनावले.

संबंधित बातम्या:

VIDEO: मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही, देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’

पंकजा मुंडेंची तोफ भगवान गडावरून धडाडणार; पंकजा यांच्या निशाण्यावर कोण?; भागवत कराड मेळाव्याला उपस्थित राहणार?