बीड : बीड येथे बोलताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे म्हणाले, गावपातळीवरच्या निवडणुका आम्ही गाव पातळीवर ठरवू देतो. गावातील ज्येष्ठ मंडळींनी एकत्र बसून काय पॅनल असावं, कसं असावं हे ठरवावं. मागच्या पंचवार्षिकमध्ये तसंच झालं. याही पंचवार्षिकमध्ये तसंच झालं. पण, काही उत्साही निवडणुकीला उभं राहण्यासाठी तयार झाले. त्यामुळं ही निवडणूक लागली. मुंडे साहेब असताना ही निवडणूक या गावात झाली होती. त्यावेळी सातही जागा आम्ही जिंकल्या होत्या. स्वर्गीय अण्णा वयाच्या २५ व्या वर्षापासून या गावचे सरपंच राहिले आहेत. अण्णा बिनविरोध २५ वर्षे सरपंच राहिलेले आहेत.
त्यानंतर एक-दोनदा निवडणुका झाल्या. लहान निवडणुकीमध्ये हे गाव जास्त रस घेत नाही. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एका कार्यक्रमात एकत्र आले होते. श्रद्धा नावाची मुलगी आलिम्पिकला खेळायला जाणार आहे. तिच्या सत्काराचा कार्यक्रम होता.
तो कार्यक्रम करत असताना सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करावा. सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्या सत्काराला यावं. त्यामुळं पंकजा आणि मी दोघेही कार्यक्रमात होता. मी सिनीअर असल्यामुळं माझ्या अगोदर पंकजा बोलल्या. गोपीनाथ मुंडे ट्रस्टचा ब्लँक चेक दिला होता. त्यामुळं तो बाऊनंस होणार नाही, याची जबाबदारी मी घेतो, असं म्हटल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.
बीड जिल्ह्यात ७४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. स्थानिक पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या चिन्हांवर निवडणूक होत नसली तरी दोन गटात निवडणुका होत आहेत. या जिल्ह्यात बहुतेक ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिंकून येतील, असं मला वाटत असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.