संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, परभणी | 22 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी सध्या आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी वेळ दिली. ही मुदत 24 डिसेंबरला संपत आहे. अशातच पुन्हा एकदा इशारा दिला आहे. परभणीतील सेलूत बोलताना त्यांनी कडक शब्दात सरकारला हा इशारा दिला आहे. 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या. नाहीतर आंदोलन तीव्र करणार, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन शब्द पटलावर घेतले. पण दोन शब्द घेतले नाहीत. त्यांनी शब्द लिहला मी नाही लिहला. ज्यांची 1967 अगोदरची कुणबी नोंद सापडली आहे. त्यांचे रक्ताचे नातेवाईक, सगे सोयरे त्यांना लाभ भेटलाच पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
उपोषण सोडण्यापूर्वी सरकारचे प्रतिनिधी प्रश्न सोडविण्यासाठी आले होते. त्यावेळी ठरलेले विषय त्याचा कागद त्यांच्याकडे आहे मात्र शिष्टमंडळाला उत्तर देता आले नाही. १९६७ अगोदरच्या नोंदी ज्याची मिळाली आहे. त्यांचे नातेवाईक, सगे सोयरे याना लाभ मिळावा ही मागणी आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
छगन भुजबळ बोलले तर आता त्यांना सुट्टी नाही . शांततेत आंदोलन होणार मात्र आता हटणार नाही. या दोन दिवसात ठरल नाही तर पुढचं निर्णय घेऊ. कायद्याच्या चौकटीत बसणार फक्त मराठा आरक्षण आहे. नोटीस देण्याच्या भानगडीत पडू नका ,एकदा तुम्हीं केले आहे. आम्ही जाहीर केलं नाही, मात्र त्यांना वाटत आम्ही मुंबईला यावं.. तर येतो. आमच्या आंदोलनाच्या वेळीच त्यांना कोरोना येतोय. सरकार ने समजून घ्यावं , विनाकारण खवळून घेऊ नये, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
आता मिळालेल्या ५४ लाख नोंदी नवीनच असू शकतात. मराठा मुलांच्या पाठीमागे मराठा मंत्री, खासदार ,आमदारांनी उभे राहिले पाहिजे,असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सेलू इथून केलं आहे. बच्चू कडू हे शब्द लिहिताना होते. त्यांच्याकडून अशी आपेक्षा नाही. ते येत आहेत. तर त्यांनी इथं येऊ द्या. दार खुली आहेत. फक्त त्यांनी सत्य ते बोलावं ही विनंती आहे, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.