कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील (Senior leader N. D. Patil) यांनी वयाच्या 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Covid 19) आल्यानंतर त्यांनी त्यावर यशस्वी उपचारुसुद्धा घेतले. त्यानंतर कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रविवारी डिस्चार्ज मिळाला. कोरोनाची लागण झाल्यानंतर एन. डी. पाटील यांना त्यांच्या पत्नी सरोज पाटील (Saroj Patil) यांनी खमकेपणाने साथ दिली. (peasants and workers party leader n d patil defeated corona at the age of 92 year)
एन. डी पाटील हे शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न मांडणारे एक लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे लवकर निदान झाल्यामुळे त्यांनी लगेच उपचार घेतले. उपचार आणि दृढ निश्चयाच्या जोरावर त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलीये. त्यांना रविवारी (16 मे) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नाहीयेत.
सध्याच्या कोरोनाकाळात एन.डी. पाटील यांच्यापर्यंत बाहेरची कोणतीही व्यक्ती पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात होती. त्यासाठी एक विशेष माणूस नेमलेला आहे. मात्र, योग्य काळजी न घेतल्यामळे एन.डी.पाटील यांना कोरोनासदृश लक्षणं जाणवत होती. त्यांतर त्यांची आधी अँटिजन टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, आरटीपीसीआर चाचणी केल्यांतर पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांच्या कुटुंबातील अन्य 9 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, सुदैवाने कोणाचीही चाचणी पॉझिटिव्ह आली नाही. आता उपचार घेतल्यानंतर एन. डी. पाटील हे कोरोनामुक्त झाले आहेत.
इतर बातम्या :
मुंबईतल्या अरबी समुद्राचं असं रुप जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल, सर्वाधिक पाहिला जाणारा Video
कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं, AIIMS आणि ICMR कडून नवीन मार्गदर्शक सूचना
(peasants and workers party leader n d patil defeated corona at the age of 92 year)