Nupur Sharma : नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्य विरोधात सोलापूरातही मुस्लिम समाज रस्त्यावर

| Updated on: Jun 10, 2022 | 4:36 PM

राज्यातील सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई मध्ये लोक रस्त्यावर उतरले आहे. लोकांचा रोष पाहायला मिळत आहे. तर मुस्लिम समाजाकडून नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Nupur Sharma : नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्य विरोधात सोलापूरातही मुस्लिम समाज रस्त्यावर
आंदोलन
Image Credit source: tv9
Follow us on

सोलापूर : प्रेषित मंहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना अटक करा या मागणीसाठी देशाच्या विविध भागात मुस्लिम सामाजाकडून निदर्शने करण्यात येत आहेत. याच्याआधी नुपूर शर्मा त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात दिल्लीतील जामा मशिदीत निदर्शने करण्यात आली. मुस्लीम समाजातील लोकांनी शुक्रवारच्या नमाजनंतर ही निदर्शने केली आहे. तसेच आंदोलकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यांना निलंबित करणे किंवा भाजपमधून बडतर्फ करणे इतकेच पुरेसे नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता या वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. आज नुपूर शर्मा त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सोलापूरमध्ये (Solapur) आंदोलन करण्यात आले. ज्यात मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता.

प्रेषित मंहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशासह विदेशातही नाराजी दिसत आहे. याच्याआधी मुस्लिम राष्ट्रांनी नुपूर शर्मा च्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला होता. त्यानंतर आता याचे पडसाद देशातील विविध भागात बघायला मिळत आहेत. तर देशातील जामा मशिदीपासून ते कोलकाता आणि यूपीच्या अनेक शहरांमध्ये उग्र निदर्शने होताना दिसत आहेत. तसेच यूपीची राजधानी लखनऊशिवाय देवबंद, प्रयागराज आणि सहारनपूरमध्येही नुपूरच्या अटकेच्या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. असेच लोक राज्यातील सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई मध्ये लोक रस्त्यावर उतरले आहे. लोकांचा रोष पाहायला मिळत आहे. तर मुस्लिम समाजाकडून नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी नवीन जिंदाल आणि नुपूर शर्मा यांना 15 आणि 22 जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.