मुंबई: देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol and Diesel) दर गगनला भिडत असल्याने लोकांचा खिसा खाली होत असतानाच आता पेट्रोल पंपचालकांना एका नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सध्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर 100 रुपयांच्या नजीक येऊन ठेपले आहेत. मात्र, प्रीमियम पेट्रोलने केव्हाच शंभरी ओलांडली आहे. परंतु, राज्यात अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर अजूनही जुन्याच मशीन्स वापरल्या जात आहेत. या मशिन्समध्ये तीन अंकी किंमत दर्शविण्याची सुविधा नसल्यामुळे (100 पेक्षा जास्त) पंपचालकांना पेट्रोल विक्री थांबवावी लागली. (Petrol and diesel rates)
सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 29 आणि 32 पैशांची भर पडली. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी प्रीमियम पेट्रोलचा दर शंभरीपार जाऊन पोहोचला. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि राजस्थानात प्रीमियम पेट्रोलचा दर 100 रूपयांच्या पुढे गेला आहे.
परभणी 97.59
मुंबई 95.46
कोल्हापूर 95.60
नाशिक 95.82
पुणे 95.12
गुहागर 96.81
हिंगोली 96.35
जळगाव 96.52
औरंगाबाद 96.62
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol rate at 100 in many cities old pumps can not display 3 digits price)
(Petrol and diesel rates)