सांगलीः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चालू असतानाच महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील काही गावांनी आता कर्नाटकात जाण्याच ठराव करून महाराष्ट्र सरकारलाच अल्टिमेटम दिला आहे. सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातीलच सीमावर्ती भागातील पेट्रोल पंपधारकांनीही चलो कर्नाटकचा नारा दिला आहे.
त्यामुळे सांगली, सोलापूरसह आता व्यावसायिक, उद्योजकही कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेत असल्याने हा वाद वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
सांगली, सोलापूर जिल्ह्यातील गावांसह पेट्रोल पंपधारकांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला असल्याने आता महाराष्ट्र सरकार याबाबत काय निर्णय घेतं त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जत तालुक्यातील गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला होता, आणि त्याप्रमाणे त्यांनी राज्य सरकारकडेही मागणी केली होती. त्यानंतर बसवराज बोमई यांनी जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केल्यानंतर हा वाद विकोपाला गेला होता.
त्यातच आज महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांची कन्नडिग्गांनी तोडफोड केली असल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.
त्यातच महाराष्ट्रातील सीमावर्ती गावांसह याच परिसरातील पेट्रोल पंपधारकांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय असल्याचे त्यांनी कळवले आहे. त्यामुळे हाविषयी आता सरकार काय भूमिका घेतं ते महत्वाचं ठरणार आहे.
जत दुष्काळग्रस्तां पाठोपाठ सीमा भागातल्या पेट्रोल पंप धारकांनी चलो कर्नाटकचा नारा दिला असल्याने सीमावादावर शिंदे-फडणवीस सरकार काय निर्णय घेणार, दुष्काळग्रस्तांसाठी काय देणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.