शरद पवार ना पक्ष एकत्र ठेवू शकले, ना कुटुंब… पंतप्रधान मोदी यांचं कुणी केलं समर्थन ?; बडा नेता नेमकं काय म्हणाला ?

| Updated on: May 03, 2024 | 1:23 PM

देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 ला दिलेल्या महामुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अनेक मुद्यांसह महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार हे या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असा खोचक सवाल त्यांनी केला. त्यांच्या या विधानावरून राजकीय क्षेत्रात अनेक पडसाद उमटू लागले आहेत.

शरद पवार ना पक्ष एकत्र ठेवू शकले, ना कुटुंब... पंतप्रधान मोदी यांचं कुणी केलं समर्थन ?; बडा नेता नेमकं काय म्हणाला ?
Follow us on

देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 ला दिलेल्या महामुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अनेक मुद्यांसह महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार हे या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असा खोचक सवाल त्यांनी केला. त्यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. विरोधकांनी त्यांच्या या विधानाची निंदा करत मोदींवर हल्ला चढवला. रोहित पवार यांनी तर मोदींनाच प्रत्युत्तर देत कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभत नाही अशी टीका केली. मात्र एका मोठ्या नेत्याने मात्र पंतप्रधान मोदी यांच्या शरद पवारांवरील विधानाचं समर्थन केलं आहे.

शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब हे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्य अगदी बरोबर आहे, असे म्हणत शिंदे गटातील नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी मोदींच्या विधानाचं समर्थन केलं आहे.

काय म्हणाले शंभूराज देसाई ?

शरद पवार हे स्वतःचं कुटुंब आणि पक्ष सुद्धा एकत्र ठेवू शकले नाहीत असं नरेंद्र मोदी म्हणाले. या मागची कारणे काय आहेत हे शरद पवार सांगू शकतील. अजित पवारांची वक्तव्य आजही आम्ही ऐकतो. ते नेहमी शरद पवार सांगतील ते ऐकत आले, पण ज्या वेळेस महायुतीमध्ये शरद पवार यांनी जाण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत आल्यावर तो बदलला हे अजित पवारांच्या तत्त्वात न बसल्यामुळे ही भूमिका आम्ही घेतली असे अजित पवार म्हणाले. यामुळेच शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब हे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्य अगदी बरोबर आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.

मोदींच्या त्या वक्तव्याला राजकीय रंग देण्याच प्रयत्न सुरू

पंतप्रधान मोदी यांनी टीव्ही9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कधीच विसरू शकत नाही. माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला.तसंच उद्धव ठाकरे अडचणीत असतील तर त्यांना मदत करणारी पहिली व्यक्ती मीच असेन, असं वक्तव्यही मोदी यांनी केलं. मात्र त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. हे वक्तव्य करून उद्धव ठाकरेंच्या समोर एक खिडकी उघडली आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

यासंदर्भातही शंभूराज देसाई यांनी त्यांचं मत स्पष्टपणे मांडलं. ‘ मोदी यांनी या मुलाखतीमध्ये शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नितांत आदर आणि प्रेम व्यक्त केला आहे. हे नातं गुजरातचे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना चे जिव्हाळ्याचे नाते आहे. या पुढील काळात देखील परिवार म्हणून राजकारणाच्या पलीकडे जर त्या परिवारा ला अडचण आली सहकार्य लागलं नेहमी पहिली मदत करणारा मी असेल. हा उद्देश नरेंद्र मोदी यांचा आहे मात्र काही वाहिन्यांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. उबाठा गटाचे विश्वज्ञानी प्रवक्ते आहेत त्यांनी कोणी जरी विंडो ओपन केला तरी आम्ही तिथे जाणार नाही, असे म्हटले. याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे आहे. यामुळे याच्याकडे राजकीय वक्तव्य म्हणून पाहू नये’ असे देसाई म्हणाले.