Maharashtra Floor Test: विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त, 2 हजार CRPF जवान मुंबईत दाखल

| Updated on: Jun 29, 2022 | 8:19 PM

शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून सेना पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून 2 हजार सीआरपीएफ जवान मुंबईत दाखल झाले आहेत.

Maharashtra Floor Test: विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त, 2 हजार CRPF जवान मुंबईत दाखल
विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरी केलेले शिंदे गट उद्या मुंबईत येणार आहे. सर्व बंडखोर आमदार उद्या फ्लोअर टेस्ट (Floor Test) देणार आहेत. यावेळी शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून सेना पदाधिकाऱ्यांना नोटीस (Notice) बजावण्यात आल्या आहेत. तसेच विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून 2 हजार सीआरपीएफ जवान (RPF Jawan) मुंबईत दाखल झाले आहेत. सर्व आमदार आज गुवाहाटीहून गोव्याला रवाना झाले. गोव्यातील ताज हॉटेलमध्ये आमदारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतर सर्व जण मुंबईत दाखल होतील.

डीसीपी आणि वरील 20 अधिकारी, 45 एसीपी, 225 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, 725 उप पोलीस निरीक्षक, 2500 पुरुष, 1250 महिला पोलीस कॉन्स्टेबल, एसआरपीएफच्या 10 कंपन्या, 750 अतिरिक्त दले उद्या फ्लोर टेस्ट आणि मुंबईतील तणावाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत.

गोव्यात कडक सुरक्षा व्यवस्था

बंडखोर नेते गुवाहाटीहून गोव्यासाठी रवाना झाले आहेत. बंडखोर यंत्रणा गोव्यात येणार असल्याने तेथील यंत्रणा सतर्क झाली आहे. गोव्यात येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करण्यात येत आहे. बंडखोर आमदार गोव्यात येत असल्याने शिवसैनिक तेथे आंदोलन करण्याची शक्यता असल्याने राज्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पत्रादेवी तपासणी नाक्यावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचे आमदार म्हणूनच तिकडे पोहचणार – शिंदे

आम्ही उद्या मुंबईत पोहचू. फ्लोअर टेस्टची जी काही प्रक्रिया आहे ती करणार आहोत. कायदेशीर जे काही आहे ते सर्व करणार आहे. आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. आम्ही शिवसेनेचे आमदार म्हणूनच तिकडे पोहचणार. उद्या फ्लोअर टेस्टनंतर आमची बैठक होईल. बैठकीनंतर पुढे काय करायचं ते ठरेल, असे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंचे भवानिक उद्गार

राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आमदारांच्या बंडखोरीमुळे या बैठकीत मुख्यमंत्री भावनिक झाल्याचे पहायला मिळाले. हे सरकार 5 वर्षे चालेल, असे म्हटले होते. पण माझ्याच काही लोकांनी मला दगा दिला. यामुळे ही परिस्थिती उद्भवली, असे भावनिक उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. तसेच सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभारही मानले. (Police deployed in Mumbai on the backdrop of law and order, 2,000 CRPF personnel arrived in Mumbai)