मुंबई : “या राज्यात महिला सुरक्षित तर नाहीयेतच. पण राज्यातील महिला या मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाहीयेत. वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी. या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती, पोलीस अधिकारी असावेत,” अशी आग्रही मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. याच प्रकरणावर ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील मागणी केली. (Pooja Chavan sucide case Atul Bhatkhalkar said that Government is trying to protect the suspect)
यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारव जोरदार टीका करत या प्रकरणाची चौकशी सरण्याची मागणी केली. “या प्रकरणात समोर आलेल्या ऑडिओ क्लीप ताब्यात घेतल्या पाहिजेत. त्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठवून तो आवाज कोणाचा आहे?, हे तपासले पाहिजे. लॅपटॉही स्कॅन केला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या सर्व तपासाच्या गोष्टी असून, गुन्हेगारांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना भातखळकर यांनी शिवसेनेचे खासदर संजय राऊत यांच्यावरही घणाघाती टीका केली. “माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांच्यावर आरोप झाले तेव्हा संजय राऊतांनी अग्रलेख लिहिले. त्यानंतर भाजपने त्यांचा राजीनामा घेतला. आता संजय राऊत कुठे गेले आहेत? हा त्यांचा दुतोंडीपणा आहे,” असे भातखळकर म्हणाले. तसेच, यावेळी अत्यंत बदनाम लोकांचं राज्य राज्यात कार्यरत असल्याचे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला.
दरम्यान, या प्रकरणाची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. उद्धव ठाकरे हे वनमंत्री संजय राठोड यांचीही बाजू ऐकून घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतरच मुख्यमंत्री पुढील कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी ठाकरे सरकारवर दबाव वाढला, राठोडांची विकेट पडणार?
मलाच जीव द्यावा लागेल, असं कथित मंत्री का म्हणाला?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गळ्याचा फास ठरणार?
(Pooja Chavan sucide case Atul Bhatkhalkar said that Government is trying to protect the suspect)