नाशिक : महाविकास आघाडीचा मुंबई येथे महामोर्चा होता. त्यावर आणि महाविकास आघाडीतील समावेश का आडला यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले हा मोर्चा महाविकास आघाडीचा आहे. आम्हाला घ्यायला मतभेद आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला घ्यायला विरोध आहे. त्यामुळे आमच्या जाण्याचा संबंध येत नाही, आम्हाला सोबत घेण्याबाबत उध्दव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचं नाही. हा मोर्चा शिवसेनेचा आहे, नावाला फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. उद्धव ठाकरे यांनी फक्त असं कळवले होते की, ‘आम्ही वंचितला महाविकास आघाडीमध्ये घायचा विचार करू’ मात्र अजित पवार म्हणाले की, ‘हा प्रश्न अजून विचाराधीन आहे’ याचा अर्थ नाही असा होतो असं प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये म्हंटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीला घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही असल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी कॉँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
राष्ट्रवादी हा श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे, त्यांना गरीब मराठा देखील चालत नाही, मी एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो नाही, ते राजगृहावर भेटायला आले
एक कुटुंब म्हणून आम्ही स्वागत केलं, इंदू मिल संदर्भात विषयांवर चर्चा झाली, एक गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे, महापुरुषांनी आदर्श समाजात ठेवला आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.
भाजपचा सामाजिक आणि राजकीय लढ्यात सहभाग नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सिम्बॉल्स नाही, त्यामुळे जे सिम्बॉल्स आहे, त्याला काळे भासण्याचे काम सुरू आहे अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका केली आहे.
जाता जाता चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, ‘आरएसएस ने खोक्याच्या संस्कृतीतून संस्था उभ्या केल्या’, त्यांनी जर वेळ दिला तर आम्ही जाहीर सत्कार करू
आज भाजप वर मीच जास्त टीका करतो, मी चाळीस वर्षे राजकारणात आहे, पण डाग नाही, सगळे डागळलेले आहे असे स्पष्ट करत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसह कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.