Prashant Koratakar arrested : प्रशांत कोरटकरला अटक, पोलिसांनी कोल्हापूरमध्ये आणलं

| Updated on: Mar 25, 2025 | 8:20 AM

काल तेलंगणमधून प्रशांत कोरटकरला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आज त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं असून थोड्याच वेळात त्याची वैदयकीय चाचणी करण्यात येणार आहे.

Prashant Koratakar arrested : प्रशांत कोरटकरला अटक, पोलिसांनी कोल्हापूरमध्ये आणलं
प्रशांत कोरटकर
Image Credit source: social media
Follow us on

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली. काल तेलंगणमधून कोरटकरला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आज त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं आहे. थोड्याच वेळात त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरटकरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या अटकेची कारवाई सुरू आहे. प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार होता, अखेर काल पोलिसांनी त्याला तेलंगणमध्ये बेड्या ठोकल्या. आज सकाळी त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं.

कोरटकर याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती, त्यानंतर तो 25 फेब्रुवारीपासून फरार होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबतही त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. नागपुरातून फरार झालेला चंद्रपूरात लपल्याची माहिती समोर आली होती. कोल्हापूर पोलिसांचे पथकाने नागपूरमध्ये त्याचा शोध घेतला होता. त्याच्या घरावर छापा मारला असता तो आढळला नाही. प्रशांत कोरटकर चंद्रपूरात असल्याचे कळल्यानंतर पथक चंद्रपूर येथे गेल्याची माहिती समोल आली. कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता. त्यानंतर, तो दुबईत पळून गेल्याचे वृत्तही समोर आले होते. मात्र अखेर त्याला काल तेलगंगणमधून अटक करण्यात आली.

कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी गेल्या आठवड्यात केली होती. कुठलीतरी यंत्रणा आहे जी कोरटकरसारख्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी शंकाही सावंत यांनी व्यक्त केली होती.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणात कोरटकरविरोधात कोल्हापूरसर राज्यातील इतर भागात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अटकपूर्व जामीनासाठी त्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती, मात्र तेथेही त्याला दिलासा मिळाला नव्हता.