सातारा : छत्रपती शिवरायांच्या अनेक गाथांमधील एक गाथा सांगितली जाते, ती म्हणजे प्रतापगडावरील (Pratapgad Fort Celebrates 352 Years Of Afzal Khan Vadh) अफजलखानाचा वध. या शौर्याला आज 352 वर्षे पूर्ण झाली. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या पंधरा वर्षांपासून प्रतापगडावरचा हा उत्सव शासकीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो. तसेच, यंदाही गडावर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थित हा शिवप्रताप दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला (Pratapgad Fort Celebrates 352 Years Of Afzal Khan Vadh).
सकाळी गडावरील देवीच्या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह जिल्हा पोलीस प्रमुख अजितकुमार बन्सल मुख्याधिकारी यांच्या हस्ते पुजाअर्चा करुन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. देवीच्या पुजनानंतर आपण आसनावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीची पालखीचे पूजन करण्यात आले. नंतर ही पालखी गडावरती नेण्यात आली.
गडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात हा प्रतापगड घुमत होता. गडावरील छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याच्या संपूर्ण परिसर हा फुलाने सजवण्यात आला होता. ज्या वेळेला मानवंदना देण्यात आली त्या वेळेला पोलिसांच्या बँड वाजवण्यात आला (Pratapgad Fort Celebrates 352 Years Of Afzal Khan Vadh).
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी प्रतापगडावर 144 लागू करुन गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली. 144 लागू केल्यामुळे गडावर येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात होती. शिवभक्तांनी गर्दी करु नये म्हणून काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे गडावर चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडावरील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच, प्रसारमाध्यमांसह शिवप्रेमींना गडावर येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे शिवप्रेमीमधुन नाराजी व्यक्त करण्यात आली.
PHOTO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट पराक्रमाची साक्ष, पोलीस दाम्पत्याकडून प्रतापगडाची हुबेहूब प्रतिकृतीhttps://t.co/KxAA96nf6l #Satara
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020
Pratapgad Fort Celebrates 352 Years Of Afzal Khan Vadh
संबंधित बातम्या :
‘संगीत संत तुकाराम’ नाटकाने तिसरी घंटा वाजणार, संजय नार्वेकर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ साकारणार!