रायगड: राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchyat election) भाजप (BJP) मोठी मुसंडी मारेल, असे भाकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी वर्तविले आहे. सध्या देशभरात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला प्रचंड यश मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. (BJP will get major success in Gram Panchayat election in Maharashtra)
ते बुधवारी रायगडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यशाचा हवाला देत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयाचा दावा केला. अपवादात्मक विधानपरिषद निवडणुकीत भाजपला एक-दोन जागा गमवाल्या लागल्या. परंतु, भाजप ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियोजनबद्धपणे तयारी करत आहे. नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीर आणि गोव्यातील निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाल्याचे दरेकर यांनी सांगितले.
ठाकरे सरकार हे भांबावले आहे. यापूर्वी भाजपने लोकाभिमुख दृष्टीकोनातून निर्णय घेतले. मात्र, ठाकरे सरकार राजकीय हेतूने निर्णय घेत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
भाजप सरकारच्या काळात सरपंचपदासाठी थेट निवडणूक होती. त्यामुळे जनतेला थेटपणे योग्य उमेदवार निवडून आणता येत होता. त्यामध्ये घोडेबाजाराची शक्यता नव्हती.
सरपंचपदासाठी निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर झाले असते तर गुणवत्तापूर्ण उमेदवार मिळाला असता. त्यांनी आपापल्या गावांमध्ये चांगल्याप्रकारे काम केले असते. पण निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर करणे म्हणजे निवडून आलेल्यांपैकी एकाची निवड करणे. राज्य सरकारला लोकाभिमुख कारभार नको आहे. दबावामुळे काही मुठभर लोकांच्या हाती कारभार देण्याचा विचार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
1. सरपंच-उपसरपंचाचे आरक्षण निकालानंतर होणार. 14 फेब्रुवारीच्या आत आरक्षण निश्चिती
2. राखीव जागांवरील उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोचपावती वा अर्ज केल्याचा पुरावा पुरेसा
1. उमेदवाराने वयाची 21 वर्षे पूर्ण केली असल्याचा जन्मतारखेचा पुरावा
2. अंतिम मतदार यादीत नाव असलेला उतारा
3. उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अपात्र ठरवलेले नसावे
4. अपत्य किती आहेत याचे प्रमाणपत्र
5. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र
6. मालमत्ता आणि दायित्वाचे प्रमाणपत्र
7. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसल्याचे, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र
8. घरी शौचालय असून वापर करत असल्याचे हमीपत्र
9. राखीव जागांवरील उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र वा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा
10. डिपॉझिटची रक्कम भरल्याचा पुरावा
11. महिला उमेदवारांनी माहेरचे जातप्रमाणपत्र असल्यास 100 रुपयांच्या बाँडवर शपथपत्र
12. टीसी किंवा सनद आदी शैक्षणिक पुरावे
13. आधार आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र
14. ग्रामसेवकांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र
संबंधित बातम्या:
ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची
तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर
सरपंच आरक्षण सोडतीला विरोध, हायकोर्टात याचिका, इच्छुकांची धाकधूक वाढली
(BJP will get major success in Gram Panchayat election in Maharashtra)