सातारा – काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राहुल गांधी यांनी विशिष्ट विधान केलं. सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी पुरावे दिले. त्यांनी काही पत्रांचा दाखला दिला. पण, भाजपानं याला विरोध केला. काळ्या पाण्याची शिक्षा हजारो लोकांना झाली होती. ही शिक्षा अतिशय वाईट होती. सावरकर यांनी १८५७ च्या उठावाबद्दल भूमिका मांडली. ते शिपायांचं बंड नव्हतं. ते स्वातंत्र्ययुद्ध होतं, असं पुस्तक लिहिलं. ते स्वातंत्र्ययुद्ध म्हटल्यामुळं इंग्रज नाराज झाले. सावरकरांवर खटला दाखल केला. तेव्हा सावरकर हे लंडनमध्ये होते. खटला दाखल केल्यामुळं लंडनमधून ते पॅरीसला गेले. तिथं त्यांना अटक करण्यात आली. जहाजातून आणताना त्यांनी जहाजातून उडी मारली. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. त्यामुळं ते क्रांतिकारी होते, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
ते म्हणाले, वि. दा. सावरकर यांना वयाच्या २८ व्यावर्षी शिक्षा मिळाली. काळ्यापाण्याच्या शिक्षेत पठाण जेलर होते. प्रचंड त्रास द्यायचे. दहा वर्षानंतर सावरकर यांची मानसिकता बदलली. वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी विचार केला. एकूण ५० वर्षांची शिक्षा झाली होती. आणखी ४० वर्षे त्यांना कैदेत काढावे लागणार होते. त्यामुळं मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. मी पुन्हा असं करणार नाही. मी तुम्हाला मदत करेन. मी ब्रिटीशांना प्रामाणिक राहीन, असं पत्र लिहिलं.
ही सर्व पत्र राष्ट्रीय संग्रहालयात उपलब्ध आहेत. राहुल गांधी यांनी फक्त पत्राची कॉपी दाखविली. माफी मागितली. पुरावा दिला, तिथं विषय संपला. ते क्रांतिकारक होते का, तर होते. इंदिरा गांधी यांनी १९६६ साली पोस्टेज स्टँप काढला. ते दोशद्रोही होते तर, इंदिरा गांधी यांना देशद्रोह माहीत नव्हता काय, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला.
ब्रिटीशांनी सोडल्यानंतर सावरकर यांना रत्नागिरीत नजरकैदेत ठेवले. ६० रुपये त्यांना मानधन दिलं जात होतं. ते साठ रुपये म्हणजे आजचे ५० ते ६० हजार रुपये होतात. ब्रिटीशांची काय सेवा करत होते. याचं उत्तर इतिहासात शोधले पाहिजेत, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
हिंदू धर्मातील वाईट रुढी परंपरांवर सुधारणावादी मतं मांडलीत. ते स्वतः ब्राम्हण होते. तरीही त्यांनी मांसाहाराचा पुरस्कार केला. त्या दृष्टीनं ते व्यवहारिक होते. त्यामुळं एखाद्या व्यक्तिचं मूल्यमापन हे तौलनिक केलं पाहिजे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.