मुंबई : सिंधखेडराजा येथे स्लिपर कोच बसला लागलेल्या आगीत 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे आता विमानातील प्रवाशांना जसा आपात्कालिन स्थितीत काय करायचे याच्या सूचना दिल्या जातात, तशाच सूचना ( Demonstrations ) आता खाजगी बस प्रवाशांना विशेषत: स्लिपर कोचच्या ( Sleeper Coach ) प्रवाशांना देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. तसेच खाजगी स्लिपर कोचच्या डीझाईनमध्ये काही त्रुटी आहेत का? याचाही फेरआढावा घेण्याचे आदेश ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडीयाला ( ARAI ) दिला आहे.
बसमध्ये एखादा अपघात घडल्यास काय करावे ? महत्वाचे संपर्क क्रमांक कुठे लिहीले आहेत ? अग्निशामक उपकरणे कुठे ठेवली आहेत, इमर्जन्सीत बाहेर पडण्याचा मार्ग कुठे आहे. तसेच हातोडी कुठे ठेवण्यात आली आहे? तसेच आापात्कालिन क्रमांक कुठे आहे ? याविषयी बसचा प्रवास सुरु करण्यापूर्वी चालक आणि क्लिनर किंवा संबंधित बस कंपनीकडून पूर्वसूचना देण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
खाजगी बसचा त्यातला त्यात स्लिपरक्लास प्रवास खरंच सुरक्षित आहे का ? असा सवाल निर्माण झाला आहे. त्यातल्या त्यात स्लीपरक्लासच्या बसमध्ये प्राधान्याने परिवहन विभाग आपात्कालिन स्थितीत घ्यावयाचे निर्णय याविषयी प्रवाशांना बस सुरु करण्यापूर्वी सूचना देण्याचे बसेस ड्रायव्हर आणि क्लिनरना सांगण्यात येणार आहेत.
एसी स्लीपर बसेसना चीन सारख्या देशांनी अपघातानंतर बंदी घातली आहे. या बसेसमध्ये अपघातावेळी बाहेर पडण्याचा मार्ग एकदमच अरुंद असतो असतो. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीत प्रवाशी बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे एसी स्लीपर बसेसचा डीझाईन पुन्हा तपासण्याचे आदेश ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडीयाला ( एआरएआय ) दिला आहे.