जळगाव : आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात येतो. आज राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम पहायला मिळत आहे. जळगावकर (Jalgaon) देखील आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. जळगावात सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या विसर्जन मिरवणुकीत जळगाव शहरातील सुमारे 65 सार्वजनिक गणपती मंडळे सहभागी झाले आहेत. या मिरवणुकीत सर्वात पुढे महापालिकेचा मानाचा गणपती आहे. त्यानंतर शहरातील विविध गणपती या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीसबंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. सुमारे 800 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणतीही अनुचूती घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
जळगावात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या विसर्जन मिरवणुकीत शहरातील 65 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली आहेत. विसर्जन मिरवणुकीत सर्वात पुढे महापालिकेचा मानाचा गणपती आहे. त्यानंतर इतर गणेश मंडळाचे गणपती या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.
रात्री बारा वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुकीला परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही मिरवणूक 12 ते 14 तास चालेल असा अंदाज आहे. दोन वर्षानंतर प्रथमच मिरवणूक निर्बंधमुक्त वातावरणात पार पडत असल्याने भक्तांमध्ये उत्साह आहे. भक्तांनी ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरल्याचे पहायला मिळत आहे. फुलांची उधळण करत लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.